शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मनमाड व नांदगाव तालुक्यातील शिवसैनिकांसाठी होऊ द्या चर्चा कार्यक्रम संपन्न
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार 8888509003.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघांतील शिवसेनाचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. पक्षाची हीच ओळख आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने तसेच मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रति निक्षष्ठाअसलेल्या निक्षष्ठावतांना एकत्र आणण्यासाठी तसेच मतदारसंघातील युवकांना एकत्र आणून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नांदगाव विधानसभा मतदारसंघात होऊ द्या चर्चा जोरदारपणे सुरु असून यामध्ये तळागाळातील शिवसैनिक उत्पूर्णपणे सहभागी होत आहे त्यामध्ये युवकांची संख्या लक्षणीय आहे. नांदगाव मतदारसंघातील प्रत्येक गावात खेडात चौकाचौकात बांधाबांधावर शिवसैनिक सर्वसामान्य गृहिणी व्यापारी, नोकरदार, विद्यार्थीवर्ग यांच्याशी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाद्वारे संवाद साधत आहे. मनमाड शहरातील सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीत होऊ द्या चर्चा कार्यक्रम शुक्रवार दि.१५/०९/२०१३ रोजी समश्रृंगी माता मंदिर, मनमाड येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाद्वारे दिंडोरी मतदारसंघाचे संपर्कप्रमुख मा. श्री. जयंतरावजी दिंडे साहेब सहसंपर्कप्रमुख प्रविण नाईक, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारीया, जिल्हा समन्वयक सुनिल पाटील, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, तालुका विधानसभा संघटक संतोष जगताप, शहरप्रमुख माधव शेलार, नांदगाव शहरप्रमुख श्रावण आढाव, सुधाकर मोरे, योगेश वाघ, विजय दराडे,उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले
होऊ द्या चर्चा मध्ये आजच्या राजकीय परिस्थितीबाबत पक्षाची भूमिकेचा समावेश करण्यात आला, सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ३२ टक्के मतदान घेणार आहेत मात्र ६८ टक्के मतदान घेणारे विरोधी बाकावर बसले आहेत, सामान्य जनतेसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गॅस चे दर ४१० वरून १९८० पर्यंत वाढलेला आहे. दिवसेनदिवस देशातील कुपोषणाचे व भुकळीचे प्रमाण वाढत चालले आहे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारने दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले मात्र तसे झाले नाही उलट सरकारी नोकन्यांचे खाजगीकरण सुरु आहे. प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा होणार असे जाहीर झाले मात्र मिळाले नाही.
मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचे जाहीर केले मात्र अद्याप कामाला सुरुवात मात्र झाली नाही, ना धनगर समाजाला आरक्षण मिळाले ना मराठा समाजाला मिळाले, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली, दहशतवाद थांबला नाही, गंगाही स्वच्छ झाली नाही, जागतिक स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला व काळे धनही भारतात आले नाही आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
सदर होऊ द्या चर्चा या कार्यक्रमास महिला आघाडी जिल्हाउपप्रमुख मुक्ताताई नलावडे, रेणुकाताई जयस्वाल, कविताताई छाजेड, तालुकाप्रमुख लिलाताई राऊत, किरणताई शिंदे, सुरेखाताई मोरे इ. महिला पदाधिकारी उपस्थित होते तसेच मनमाड व नांदगाव तालुका पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या