Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बुधलवाडी येथे" मेरी मिट्टी मेरा देश" उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेने सर्वांचे लक्ष वेधले.


जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार 8888509003.

 मनमाड- बुधलवाडी भागातील क्रांतीवीर वसंतराव नाईक न.प. शाळा क्रमांक ११ च्या वतीने" मेरी मिट्टी मेरा देश" उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेने सर्वांचे लक्ष वेधले.

       बँड तालावर निघालेल्या यात्रेच्या अग्रभागी डोक्यावर अमृत कलश विद्यार्थिनी होत्या. नागरीकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत अमृत कलशमध्ये माती व तांदुळ टाकत रॅलीचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय , वंदे मातरमसह देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

          न.प.शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अशोक सानप, राजाभाऊ पवार, रामभाऊ सांगळे, बबनराव शिंदे, अरविंद घुगे, सचिन कराड, योगेश सांगळे, सागर शिंदे, सौ.वैशाली घुगे,सौ.दया काळे आदी उपस्थित होते. प्रभारी मुख्याध्यापक पी.बी.गोरे,उपशिक्षक नितीन कोल्हे, सौ.वंदना साखरे यांनी संयोजन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या