जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.8888509003
मनमाड :- गेल्या काही दिवसांपासून मनमाड शहरात विज पुरवठा करणारे फिडरवर १३२ kv वर च्या सुचने नुसार अपातकालीन लोडशेडिंग करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात कधीही अचानक विजपुरवठा खंडीत होतो व सुरळीत कधी होणार याची कुठलीही माहिती ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे शहरातील व्यापार, बँका, हॉस्पिटल या ठिकाणी तारांबळ होऊन मोठे नुकसान होत आहे. तसेच नागरिकही हैराण होत आहे. या व्यतीरिक्तही ३ ते ४ तास तांत्रिक बिघाड चे कारण देऊन सतत वीजपुरवठा खंडित होत आहे व त्याला जोडून आपातकालीन भारनियमन म्हणजे सलग ५/५ तास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. यावर कुठलेही लक्ष अधिकारी वर्गाचे नसल्याचे आढळून येत आहे. त्यांना आपण कळविल्यानंतर याची नोंद होते. यामुळे जनतेत वीज कंपनी विषयी रोज निर्माण होत आहे.
याप्रमाणेच रात्री अपरात्री अपातकालीन परिस्थितीत कोणीही कर्मचारी कार्यालयात सेवेस नसतो त्याची माहिती घेतली असता रात्री ११ ते सकाळी ८ वाजेपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यांची ड्युटीच लावलेली नसल्याने एखादी अपातकालीन अप्रिय घटना घडल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.त्यामुळे यावरही संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन अशी ड्युटी लावण्यात यावी. अपातकालीन भारनियमन हे अर्बन परिसरात न करता इतरही पर्याय असतांना असा निर्णय हा तुघलकी स्वरूपाचा आहे. सध्या शहरातील वीज बिल वसुली चोरी यावर चांगल्या पद्धतीने सुधारणा होत असतांना असा निर्णय शहरावर लागू नये. असा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर देऊन आपण यामध्ये याबाबत सकारात्मक निर्णय घडवून आणावा.
अन्यथा याप्रकारामुळे शहरात असंतोष निर्माण होऊन त्याचा रोष विज मंडळावर व्यक्त होईल व त्यावेळी शिवसेना मनमाड शहर हे जनतेसोबत राहील याची नोंद घ्यावी. शिवसेना शहर अध्यक्ष मयूर बोरसे, फरहान दादा खान, स्वक्षऱ्या असलेले निवेदन उपस्थित पदाधिकारी यांच्यातर्फे देण्यात आला.
0 टिप्पण्या