Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

रेल्वे पोलिसांच्या उत्तम कामगिरी मुळे एक इसमाचा जीव वाचला

 

रेल्वे पोलिसांच्या उत्तम कामगिरी मुळे एक इसमाचा जीव वाचला .

जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.

मनमाड.दि. 25 6 2023 रोजी पुणे येथे कामाला गेलेला एक इसम पुणे दानापूर एक्सप्रेस ने त्यांचे मूळ गावी लखनपूर गया बिहार येथे जात असताना जनरल डब्यातील काही व्यक्तींनी नियंत्रण कक्षास फोन  करून माहिती दिली की सदर ईसम मानसिक दृष्ट्या कमकुवत असून तो गाडीतून उडी मारण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे रेल्वे पोलीस स्टेशन मनमाड येथील अंमलदार यांनी तात्काळ सदरची गाडी अटेंड करून इसम नामे प्रदीप रपु रविदास वय 45 वर्ष धंदा मजुरी राहणार ग्राम लखनपूर पोस्ट बुध गेरे ठाणा मुफाशील जिल्हा गया बिहार यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले तसेच त्याचे नातेवाईकास संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की त्यांना बिहार येथून पोहोचण्यास वेळ लागणार आहे सदर व्यक्तीच्या मनावर परिणाम झालेला आहे तो जीवाचे काहीतरी बरे वाईट करू शकतो आम्ही येईपर्यंत त्यास थांबून ठेवावे त्याप्रमाणे रेल्वे पोलीस स्टेशन मनमाड येथे नमूद इसमास वैद्यकीय तपासणी करून त्याचे नातेवाईक येईपर्यंत त्याचा पोलिस आमलदाराने व्यवस्थित संभाळ केला त्याला खाऊ पिऊ घातले व दिनांक 27 07 2023 रोजी रात्री त्याचे नातेवाईक बिहार इथून आल्यानंतर सदर इसमास सुरक्षित रित्या नातेवाईकांच्या(गायत्री देवी प्रदीप रविदासवय 40 वर्ष व कपिल कुमार रामप्रीत रविदास वय पंचवीस वर्ष) ताब्यात देण्यात आले आहे रेल्वे पोलिसांमुळे एक इसमाचा जीव वाचला सदरची कामगिरी माननीय पोलीस महासंचालक रेल्वे महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमती डॉक्टर प्रज्ञा सरवदे मॅडम यांच्या कर्तव्याच्या पलीकडे या मोहिमेतून केली असून माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील मॅडम माननीय पोलीस अधीक्षक गणेश शिंदे सर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड श्री मारुती पंडित सर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली कामगिरी करणारे अमलदार पो ह दिलीप महाजन वाल्मीक कदम नितीन मानकर बाजीराव बोडके पोलीस नाईक रेहान शेख प्रकाश पावशे पोलीस शिपाई जितेंद्र देशमुख महेंद्र माळी सिद्धेश्वर मोरे गजानन धायडे रवींद्र शर्मा विष्णू गोनडे प्रेम शेलोटे विजय जगनीत यांनी पार पाडली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या