Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड महाविद्यालयात उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या सहकार्याने जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा.


 मनमाड महाविद्यालयात उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या सहकार्याने जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा.

जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

 मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात उप जिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या सहकार्याने जागतिक हिपॅटायटीस दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उप प्राचार्य डॉ.बी.एस देसले, उप जिल्हा रुग्णालय मनमाड चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पवन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यानुसार

प्रयोग शाळा तंत्रज्ञ

 जितेंद्र बिरारी यांनी हिपॅटायटीस, व एचआयव्हीची* पूर्ण माहिती देवून यावर्षी चे घोषवाक्य 'वी आर नाॅट वेटींग' बाबत माहिती दिली . या प्रसंगी समुपदेशक श्री.प्रसाद नवले व श्री राहुल भगत हे याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. पी बी परदेशी यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबीन क्लब व प्राणीशास्त्र विभागातर्फे करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या