Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

तुमच्याही मोबाईलवर आलं का धोक्याचा इशारा देणारं नोटिफिकेशन?



 तुमच्याही मोबाईलवर आलं का धोक्याचा इशारा देणारं नोटिफिकेशन?

जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.8888509003

गोंधळून जाऊ नका,जाणून घ्या काय आहे हे..

मिळालेल्या माहितीनुसार, हे इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम आहे. आपत्ती आलेल्या भागात अश्याप्रकारे DOT कडुन मोबाईलवर अलर्ट दिले जाते कि आपत्तीजनक परिस्थिती आहे. जेणेकरून सावधानता बाळगावी. एप्रिल महिन्यात टेलिकॉम रुल्स मधे सुधार करून हे फिचर सर्व मोबाईल कंपन्यांना अनिवार्य करण्यात आलेले आहे.

देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही.सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.

मराठीमध्येही आलं नोटिफिकेशन
सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही.

महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे म्हणाले की, अतिवृष्टीचा इशारा देण्यासाठी हा पॉपअप तयार करण्यात आला आहे. सर्व टेलिकॉम कंपनीतर्फे हा मेसेज करण्यात येतो आहे. काळजी करण्याचे किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही. असे स्पष्टीकरण दिले आहे. नागरिकांना अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थिती याची पूर्वकल्पना देण्यासाठी ही चाचणी करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.

यापूर्वी एप्रिल महिन्यात ब्रिटनमध्येही अशाच प्रकारची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीवेळी 'कीप काल्म अँड कॅरी ऑन' असा संदेश यूकेमधील सर्व नागरिकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या