Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीची बैठक बोलावली



 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीची बैठक बोलावली 

जन आवाज न्युज.

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांकडून लेखी उत्तर मिळाल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. किती आमदारांनी नोटीसला उत्तर दिलं आणि किती आमदारांनी मुदतवाढ मागितली याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. लवकरच या आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या