शाळा आणि कॉलेज सुरु झाली आहे पालकांकडून वेळीच योग्य उपाययोजना करणे गरजेचे--
जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार 8888509003.
मोबाइलच्या माध्यमातून वेगवेगळे खेळ प्रकार आणि त्याच्या अगदी आहारी जाऊन टोकाची भूमिका किंवा निर्णय घेताना अनेक बाल्य अवस्थेतील मुलं आपण पाहतोय मोबाईल आणि टिव्ही यापासून मुलांना दुर ठेवणं कोणत्याही पालकांना सध्या तरी शक्य नाही परंतु हळुहळु त्याच प्रमाण कमी करून पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं आहे . पर्यायी व्यवस्था म्हणजे मोबाईल आणि टिव्ही यापासून मुल कसे जास्तीत जास्त दुर राहतील यासाठी योग्य नियोजन करून मोबाईलच्या विळख्यातून त्यांना नक्कीच बाहेर काढु शकतो .पण तशा पद्धतीच नियोजन करणं खुप महत्वपूर्ण आहे.मोबाईल व टिव्ही मधील वेगवेगळ्या खेळ प्रकारात मुलं इतकी मग्न झाली आहेत की अक्षरशः भुक लागली आहे याची जाणीव न होणं म्हणजे किती खोलवर परिणाम झाला आहे . त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करणं इथं पर्यंत ठिक आहे. परंतु मोबाईल वापरावर प्रतिबंध घातला म्हणून काही मुल स्वतः च्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या जीवावर उठण्याचे प्रकार हळूहळू घडत आहेत . प्रथम दर्शनी हे प्रमाण खूप कमी असलं तरी भविष्यात याच रूद्र रूप पाहायला मिळु शकत. म्हणून योग्य वेळी पालक म्हणून आपण जागृत होऊन योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे .
सोशल माध्यमातील वेगवेगळे प्रकार मोबाईल , टिव्ही , वेगवेगळे सिनेमा त्यातील विविध घटना यांचा मुलांच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊन अगदी टोकाचे पाऊल उचलण्या पर्यंत काही मुल गेली आहेत . काही त्या दिशेने आहेत तर काहींची सुरुवात आहे आज सुपात असणारा उद्या जात्यात असतो . म्हणून एकंदरीत सर्व मुलं हि सोशल माध्यमा च्या विळख्यात घट अडकतांना पाह्यला मिळत आहे. हे भयानक असं वास्तव आहे . आणि यावर योग्य वेळी उपयोजना करून हा विळखा तोडण्याची आवश्यकता आहे.मुलं हि भावी नागरिक असतात देशाचं समाजाचं भविष्य असतात आणि बाल वयात ज्या पद्धतीने त्यांच्या संस्कार होतात त्याच पद्धतीने ती घडतात . त्यांच्या जडणघडणीत वेगवेगळ्या पैलुचां समावेश असतो. आपण कितीही चाणाक्ष असलो तरी आपली मुलं आपल्याला चुकवून आपल्या परोक्ष काही बाबी करत असतात हे अगदी सत्य आहे .हे कोणीही पालक म्हणून नाकारू शकत नाही. आणि नाकारलेच तर कुठं तरी आपण सत्या पासून फारकत घेतोय . परंतु याला काही मुल हि नक्कीच अपवाद पण आहेत हे पण सत्य आहे . परंतु बहुतांश मुलं या पद्धतीने वावरताना दिसतात.पालक म्हणून आपल्याला कुटुंब चालवायचं असतं दैनंदिन कामकाज कराव लागत आपण पुर्णवेळ लक्ष देऊ शकत नाही. आणि ते शक्य पण नाही . सगळ्यात महत्त्वाची बाब हि आहे की मुलं नेमकी सोशल नेटवर्कर जसं टिव्ही मोबाईल वेगवेगळे गेम कशी अडकली .याची मुख्य कारण काय तर आपण लहान असताना गल्ली गल्ली मध्ये वेगवेगळ्या ग्रामीण खेळात मुलं ज्या पद्धतीने मग्न होत असत . सध्या हे सगळे खेळ बंद नव्हे इतिहास जमा झाले आहेत . आणि मैदानी खेळ हे पण संपुष्टात आले आहेत .आज खुप कमी मुलं मैदानी खेळात प्रविण व मग्न असतात तसेच आजी आजोबा यांच्या कान गोष्टी अध्यात्मिक ज्ञान , शेजारी वगैरे यांच्याकडील गप्पा गोष्टी हे सगळं बंद झाल्यामुळे मुलां जो रिकामा वेळ मिळतो .आहे त्यामध्ये मुंल स्वतः ला एकट समजतात आणि मग मोबाईल हा आपला खरा साथीदार आहे असं त्यांना वाटतं आणि असं वाटण स्वभाविक न्याय सांगत आहे. करमणुकीचे साधन बंद झाली . दार खिडक्या बंद प्रथा सुरू झाली .अनेक मुलं एकत्र येऊन काही खेळ खेळतात ते सुद्धा संपुष्टात आलं.आणी मुलं अगदी एकलकोंडी झाली मोकळं फिरता येत नाही. संवाद साधण्यासाठी शेजारी जाण्याची किंवा इतर मुलांकडे जाण्याची सुविधा नाही मग हि एकटी पडलेली मुलं करणार तरी काय यावर योग्य आणि आवश्यक त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे . मुलं आणि पालक यांच्या मध्ये समन्वय वाढला पाहिजे मुलांना आपण मुलं न समजता मित्र समजुन त्यांचं मनमोकळा झालं पाहिजे असा संवाद साधला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज महापुरुष यांच्या विषयी माहिती आपण कथा स्वरूपात सांगितली पाहिजे मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे . दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ मुलं वेगवेगळ्या कामांत व्यस्त कशी राहतील याच नियोजन आपण केले पाहिजे. अध्यात्मिक ज्ञान गोडी निर्माण व्हावी यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. आणि वाचन गोडी लावली पाहिजे . जेणेकरून मुलां मध्ये सद्गुण विकसीत होईल.
आणि भविष्यात उदभवणारा खुप मोठा धोका आपण टाळु शकतो आणि एक सुयोग्य व सक्षम पिढी निर्माण करु शकतो असे मनोगत कामगार श्रेत्र पत्रकार राजेंद्र धिंगान यांनी व्यक्त केले
0 टिप्पण्या