Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मुलांच्या जन्म नोंद दुरुस्तीला आई वडिलांच्या लग्नाचे पुरावेची गरज काय.? मनमाड नगर परिषदेला नेमक तपासणीतरी करायची काय.?

 


जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

मनमाड :- मनमाड नगर परिषद जन्म मृत्यू नोंदणी विभागाचे, अजब गजब व मनमानी कारभार समोर आलय, जन्म मृत्यू विभागाच्या कार्यालयात जन्म नोंद दुरुस्तीचे लागणारे कागदपत्रांचे नोटीस फलक कार्यालयात लावण्यात आले आहे,
सदर नोटीस फलक मध्ये, मनमाड नगर परिषदेचे मुख्यधिकारी तथा प्रशासक साहेब यांची स्वाक्षरी देखील आहे, सदर नोटीस फलका नुसार मुलांच्या आई वडिलांच्या नावात दुरुस्ती साठी, लागणारे कागदपत्रांची यादीत दिलेली असून , आई वडिलांच्या नावात दुरुस्ती साठी, 1) अर्ज,2) नमुना अर्ज,3) शपथेवर केलेले प्रतिज्ञापत्र, 4) ज्या जन्म दाखल्यावर दुरुस्ती हवी असेल त्या जन्म तारखेच्या अगोदरचे पुरावे, उदा :- इलेक्शन कार्ड, रेशन कार्ड, व अन्य शासकीय पुरावे, 5) दवाखान्यातील दुरुस्त पत्र, 6) लग्नाचे पुरावे,अशी यादी दिलेली आहे.

यादी प्रमाणे क्र 6 वर मुलांच्या आई वडिलांचे लग्नाचे पुरावे हे मनमाड जन्म मृत्यू विभागाकडून मांगणी करण्यात येत आहे.

आई वडिलांच्या नाव दुरुस्ती साठी त्यांचे नावाचे शासकीय पुरावे, उदा आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, राशन कार्ड, हे पुरेसे नाही का, जर हे पुरावे पुरेसे असेल तर मुलांच्या जन्म नोंद दुरुस्तीला आई वडिलांच्या लग्नाचे पुरावेची गरज काय.? मनमाड नगर परिषदेला नेमक तपासणी तरी करायची काय आहे, हे समजेना,? अशी प्रतिक्रिया नागरिकांतर्फे दिली जात आहे.

लग्न झाल्या नंतर महिलांचे आधारकार्ड पतीच्या नावासहित अपडेट केले जातात, रेशन कार्ड मध्ये देखील लग्न झालेल्या महिलांचे नाव समाविष्ठ केले जातात, या पुराव्याच्या आधारेच, पुढे गरोदर महिला भगिनी चे जननी सुरक्षा योजने अंतर्गत प्ररस्तुती कार्ड जिल्हा आरोग्य विभागा तर्फे तयार केले जाते, 
प्ररस्तुती नंतर बाळाची जन्म नोंद ही रुग्णालयात केली जाते, नंतर ही जन्म नोंद रुग्णालया तर्फे नगर परिषद जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयास पाठवली जाते, परंतु रुग्णालयात प्रथम जन्म नोंद करतांना नातेवाईकांकडून नावात काही चुका होत असतात, अथवा जन्म दाखला देतांना जन्म मृत्यू विभागातर्फे देखील चुका होत असतात, म्हणून शासनाने जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व 2000 मध्ये कलम 15 व नियम 11 अन्वये जन्म नोंदीत दुरुस्ती करण्याची तरतूद दिलेली आहे, सदर तरतुदी नुसार दोन ते तीन शासकीय पुराव्याच्या आधारे,नावात झालेली चूक दुरुस्ती करण्याची तरतूद उपलब्ध आहे.

परंतु मनमाड नगर परिषद जन्म मृत्यू नोंदणी विभागातर्फे शासकीय पुरावे सोबत, आई वडिलांचे थेट लग्नाचेच पुरावे का मांगीतलें जात आहे, व हे कितपत योग्य आहे, अशी चर्चा रंगु लागली आहे.


मनमाड नगर परिषद जन्म मृत्यू विभागातील हुशार कर्मचारी हे पालकांचे लग्नाचे पुरावे घेऊन, बाळाच्या जन्माच्या वेळी पालकांचे,/ आई वडिलांचे लग्न झाले होते की नाय.? हे तर तपासणी करत नाही ना.? अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांतर्फे दिली जात आहे.

मनमाड नगर परिषद जन्म मृत्यू नोंदणी विभागाने मनमानी पद्धदतीने गरज नसलेले कागदपत्रे मांगणी करू नये जे कागदपत्रे गरजेचे आहे तेच शासकीय पुरावे मागावे , व असे प्रकारचे नोटीस फलक लावून पालकांना अपमानीत करू नये, सदर नोटीसातून लग्नाचे पुरावे हे तात्काळ काढण्यात यावे, मनमाड नगर परिषद जन्म मृत्यू विभागाच्या अश्या कृतीने आमचे महिला भगिनींचे अपमान होत आहे, असे नागरिकांतर्फे सांगण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या