Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

राज्यात रात्री 10 नंतर दारूचे दुकान उघडे ठेवल्यास दोन वेळा समज नंतर लायसन रद्द

 

राज्यात रात्री 10 नंतर दारूचे दुकान उघडे ठेवल्यास दोन वेळा समज नंतर लायसन रद्द 

जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार 8888509003.

 राज्यात दारू दुकाने रात्री दहा वाजेपर्यंतच नियमानुसार उघडी ठेवता येतात. मात्र जर या वेळेचे कोणी दुकानदार उल्लंघन करत असेल तर त्याला दोन वेळा समज देण्यात येईल. तिसऱयांदा जर त्याच्याकडून उल्लंघन झाले तर त्या दुकानाचे लायसन्स रद्द करण्यात येईल, अशी घोषणा उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी  विधानसभेत केली.राज्यातील अवैध दारूनिर्मिती, तस्करी तसेच विक्रीमुळे हजारो संसार उद्ध्वस्त होत आहेत. राज्यातील महिला वर्गात यामुळे नाराजीची भावना असल्याचा मुद्दा अभिमन्यू पवार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यावर शंभुराज देसाई म्हणाले, उत्पादन शुल्क खात्यात पाच महिन्यांत नवीन पदे भरण्यात येतील. अवैध मद्यनिर्मिती आणि तस्करी याबाबत कडक धोरण स्वीकारले आहे. एमपीडीएच्या 11 केसेस केल्या आहेत. अवैध मद्यविक्री, हातभट्टीची दारू विक्रीवर कठोर कारवाई करणार आहोत. पोलीस विभागाच्या धर्तीवर उत्पादन शुल्क विभागाचेही खबऱयांचे नेटवर्क उभारण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या