Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

जगाला देईल ज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण ..? मनमाड MECB कर्मचारिंचा बिन डोकपणा, वैद्दच पोर लंगड सारखी झाली गत.





जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार.8888509003

मनमाड :-  MECB चा बिन डोकपणाचा  कारभार..बंद कार्यालयतील अनावश्यक विद्युत उपकरणे,रात्रभर सुरु, 

 देशभरात कोळसा कमी प्रमाणात असल्याने विद्युत उपकरणे योग्य त्यावेळी चालू - बंद करण्यात यावे असे महाराष्ट्र शासन ऊर्जामंत्रालय तर्फे  सूचना केल्या जातात. वीज काटकसरीने न वापरल्यास राज्यभरात भारनियमन करण्याची परस्थिती देखील येते, परंतु  महा,रा, वि वि कं मर्या, मनमाड मुख्य कार्यालयात, लाईट बंद करण्यासाठी सुद्धा प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना वेळ नसल्याचे दिसून आले आहे, दि 08/05/2023 रोजी MECB कार्यालय बंद असतांना कार्यालयातील सर्व सिलिंग पंखे व लाईट हे रात्रभर सुरूच होते 

ऊर्जा बचत करा हे नियम फक्त सर्व सामान्य जनतेसाठीच आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु शासकीय कर्मचारी तर्फे शासकीय कार्यालय बंद करतांना उपकरणे हे बंद करण्याची जबाबदारी नाही का.? 

 कोळसा कमी पडत असल्याने विज महाग होत आहे, परंतु शासनाचे कर्मचारी अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे,

महावितरण हे नागरिकांना वीज काटकसरीने वापरावे हे कळकळीचे आवाहन करत असते, कारण कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला कधी कधी मागणीच्या तुलनेत कमी वीज पुरवठा होतो, या कारणाने भारनियमन करावे लागते भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू असतात वीज ग्राहकांनी वीज व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी विजेची सर्वाधिक मागणी ज्यावेळी म्हणजे सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा. ग्राहकांना महावितरणची कळकळीची विनंती असते की  विजेचा काटकसरीने वापर करावा असे केल्यास भारनियमन बहुतांशी प्रमाणात कमी होतील,

घरातील, कार्यालयातील, किंवा इतर ठिकाणावरील अतिरिक्त विद्युत उपकरणे योग्य वेळीच वापरा, विजेची बचत करा, अनावश्यक विद्युत उपकरणे योग्य वेळीच बंद करा, काटकसरीने वीज वापरा, भारनियमन टाळा. असे आवाहन विद्युत महावितरण कडून करण्यात येते परंतु स्वतःच्या विभागातील कर्मचारी व अधिकारी हे विजेची उधळपट्टी करतांना दिसत आहे.

वीजटंचाईवर सर्वांनी मिळून करु मात, ग्राहकहो तुमचीही हवी महावितरणला साथ. असे कळकळीचे आवाहन महावितरण करीत असते . परंतु विभागाचे स्वतः कर्मचारी अधिकारी याकडे दुर्लक्ष करतांना दिसलें आहे. कार्यालय बंद करतांना विद्दूत उपकरणे हे बंद करण्याची जबाबदारी पाळली जात नाही, यावर महावितरण काय कारवाई करेल औत्सुक्याचे ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या