मनमाड :येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दी वर्ष सोहळा उत्साहात संपन्न झाला. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण केल्यानंतर आपल्या मनोगतातून डॉ. अरूण पाटील यांनी लोककल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा नष्ट होणार नाही याची जाणीव राजर्षी शाहू महाराजांना होती. म्हणून त्यांनी शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला व आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केल्या. जागोजागी वस्तीगृह स्थापन केले. भटक्या विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. राजर्षी शाहू महाराज हे थोर समाज सुधारक होते. शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्य निवारण. इत्यादी सुधारणाचे पुरस्कर्ते होते. या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जी. एल. शेंडगे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. ज्योती पालवे, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य श्री पी.के. बच्छाव, वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. व्ही अहिरे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या