Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

जात बघून उपचार हे गैरसमज आहे , शासकीय योजनेच्या पात्र लाभार्थीना लाभ देण्यास, बाहय रुग्ण पत्रीकेत (केस पेपर वर) जातीचा उल्लेख, उप जिल्हा रुग्णालय मनमाड,

 


जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.

मनमाड :- सद्या मनमाड शहरात उपजिल्हा रुग्णालय, मनमाड, येथे रुग्णास जात विचारल्याबाबत  प्रकरण सुरु असून, सदर प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, मनमाड, यांनी प्रस्तुत प्रकरणी खुलासा सादर केला आहे.

न्यूज चॅनल वर प्रसारीत झालेल्या उपजिल्हा रुग्णालय, मनमाड, जि. नाशिक येथे रुग्णास जात विचारल्या बाबत, बातमी प्रसारित झाली आहे,  परंतु रुग्णास बाहय रुग्ण पत्रीकांचा पुरवठा हा येरवडा प्रिंटीग प्रेस यांचेकडून करण्यात येतो व आवश्यकता भासल्यास बाहय रुग्ण पत्रीकांची छपाई स्थानिक स्तरावरुन करण्यात येते, सदरील बाहय रुग्ण पत्रीकेचा विहित नमुना हा निश्चीत करण्यात आलेला असुन तोच नमुना संपुर्ण महाराष्ट्रभर वापरण्यात येतो, सदर बाहय रुग्ण पत्रीकेच्या नमुन्यात जात हया रकान्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे उपचारासाठी येणा-या रुग्णाची परीपुर्ण माहिती रुग्णालयात असणे आवश्यक असल्याने तसेच बाह्य रुग्ण पत्रीकेवर सुध्दा परीपुर्ण माहिती असणे आवश्यक असल्याने रुग्णास जात विचारणे क्रमप्राप्त ठरते.

२) तसेच वरीष्ठ कार्यालयास तसेच शासनास दरमहा सादर करावयाच्या अहवालामध्ये बाह्य रुग्ण विभाग व आंतर रुग्ण विभागात उपचार करण्यात आलेल्या रुग्णांची माहिती सादर करण्यात येते त्याच्या विहित नमुन्यात एस.सी., एस. टी. ओ.बी.सी. व जनरल व पुरुष, स्त्री, ट्रान्सजेंडर अशी माहिती देणे क्रमप्राप्त असते त्यामुळे रुग्णांना जात विचारणे क्रमप्राप्त ठरते.

३) भारत सरकार, आरोग्य व कु. क. मंत्रालय, यांच्या जननी सुरक्षा योजनेबाबतच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्राप्त क्र. ३५ च्या उत्तरामध्ये एस.सी. व एस.टी. समुदायातील महिलांना त्यांचेकडे दारीद्रय रेषे खालील कार्ड नसेल तरी त्यांना लाभ अदा करण्याबाबत सुचना प्राप्त आहेत. तसेच जननी सुरक्षा योजनेच्या वेगवेगळ्या अहवालामध्ये सुध्दा एस.सी. एस. टी. जनरल व एकूण अशा विहित नमुन्यात माहिती देणे आवश्यक आहे त्यामुळे सदर संवर्गातील रुग्णांना दयावयाचे लाभ हे योग्य त्या लाभार्थ्यांनाच दिले जातील याची काळजी घेण्यासाठी व शासन स्तरावर त्याबाबत दयावयाची माहिती हि बिनचुक तयार करण्यासाठी सुध्दा जात विचारणे आवश्यक ठरते. तसेच 

४) एन.एच.एम. अंतर्गत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत (जे.एस.एस.के.) प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार एस.सी. व एस. टी. समुदायातील रुग्णांना दयावयाचे आर्थिक व इतर लाभ हे निश्चित करण्यासाठी रुग्णाच्या जातीची माहिती घेणे आवश्यक आहे.

५) कुटुंब कल्याण शस्त्रक्रिये अंतर्गत स्त्री नसबंदी केलेल्या रुग्णांपैकी फक्त द्वारीदयरेषे खालील तसेच एस. सी. व एस. टी. रुग्णांनाच लाभार्थी ठरविण्यात आले असुन त्यांना रु. ६००/- अनुज्ञेय करण्यात येतात त्यामुळे आपोआपच रुग्णांना जात विचारणे भाग आहे.

६) वरील प्रमाणे योजनांचा लाभ अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमाती इ. संवर्गातील रुग्ण / लाभार्थी यांनाच अनुज्ञेय असल्याने रुग्णांना जात विचारणे कर्तव्यावरील कर्मचा-यांना भाग पडत आहे.

वरील बाबींचा विचार करता हयात कर्तव्यावरील कर्मचारी यांनी रुग्णास बाहय रुग्ण पत्रीका देतांना जात विचारली हया वरुन रुग्णालयात जात विचारून उपचार केले जातात असा अर्थ काढणे संपुर्ण पणे चुकीचे आहे. जर कर्तव्यावरील कर्मचारी हयांनी जातीची विचारणा केली नाही तर पात्र असलेल्या रुग्णास त्यास शासनस्तरावरून अनुज्ञेय होणा-या लाभापासून तो वंचीत रहाण्याची दाट शक्यता आहे तरी सदर बाबत प्रसारीत झालेली बातमी ही पुर्णपणे गैरसमजतून तयार झालेली दिसुन येते यात कर्मचारी किंवा अधिकारी यांचा कोणताही गैरहेतू किंवा जात पाहुन उपचार करणे असा उद्देश नाही हे स्पष्ट होते.

असे खुलासा पत्र उप जिल्हा रुग्णालया तर्फे जाहीर करण्यात आले आहे,



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या