केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा असंविधानिक.माधव शेलार.मनमाड शहर शिवसेना प्रमुख.
जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार.
दि. 17/02/2023 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण है। चिन्ह शिंदे गटाला दिले हे कृत्य कोणत्याही आधारे कायदेशीर नाही. निवडणूक आयोगाने वेळोवेळी मागितलेली माहिती व पुरावे पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी सादर केली आहे, तरी देखील त्याचा काहीएक विचार न करता सत्ताधारी पक्षाच्या दबावापोटी एकतर्फी निर्णय देण्यात आला, यावरून हे सिद्ध होते की या देशात संविधानाला न मानणारा एक घटक तयार झाला आहे व देश हळूहळू गुलामगिरी कडे झुकत चालला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बहाल करण्याचे वेळेस असे उदगार काढले होते की, अथक प्रयत्न करून जे संविधान लिहीलेले आहे ते लोकहितासाठी आहे, परंतु सरकार बेजबाबदार असेल तर या संविधानाला कुठलाही अर्थ राहणार नाही व देश पुन्हा गुलामगीरीत जाईल. सदया तेच घडताना दिसत आहे. संविधानाचा योग्य प्रकारे पालन होताना दिसत नाही. आयटी. सि. बी. आय. ईडी आणि केंद्रीय निवडणूक आयोग या सर्व यंत्रणा केंद्र सरकारच्या इशा-यावर चालक आहे. असेच चालत राहिले तर पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल. मी नांदगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना आश्वासित करू इच्छितो की यामुळे घाबरून जाण्याची खचून जाण्याची गरज नाही. कारण आपण सर्व हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे कडवट शिवसैनिक आहोत व कोणत्याही बिकट परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणारे शिवसैनिक आहोत, जो घाबरला तो शिवसैनिकच नाही, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही हे ब्रीदवाक्य ही घोषणा शिवसेनेचीच आहे. ठाकरेशाही इतक्यात संपणारी नाही तर हा एक उगवता सूर्य आहे जन आकाशातील सूर्यशिवाय जीवनाची कन्हाना करणे कठीण आहे, तसेच महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे व त्यांच्य वंशज मा. उद्धव ठाकरे साहेब व मा. आदित्य ठाकरे साहेब यांच्या शिवाय पर्याय नाही. आजच्या परिमथितीत एवदेव सांगू इच्छितो की सत्य परेशान हो सकता है। लेकीन, कभी पराजित नहीं हो सकता है। सत्येचा न्याय हक्काचा लढा संविधानिक मागति उभारण्याची गरज आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र एकवटल्याशीवाय राहणार नाही विजय हा सत्याच होईल. समुद्राला घाबरणारी नाव (ओडी) कधीही किणारा गाठत नाही. आणि प्रयत्न करणा- त्याला अपयश येत नाही.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या