अस्थिवर वृक्षारोपण करून, पिताचे आठवण जिवंत ठेवण्याचे कार्य करणारे मनमाडचे केदारे कुटुंब,
जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार. मनमाड - पिताच्या मृत्यूनंतर अस्थी व रक्षा नदीत विसर्जित करण्याच्या प्रथेला फाटा देत मनमाडच्या बुधलवाडी भागातही केदारे कुटुंबियांनी घराजवळ खड्डा करून अस्थी व रक्षा दफन करत त्याच ठिकाणी वृक्ष लावून पिताच्या आठवणी कायमच्या जतन करत समाजापुढे आदर्श घालून दिला.
मनमाडच्या बुधलवाडी भागात राहणारे काळू दगाजी केदारे यांचे 88 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,सहा मुले , सुना ,नातवंडे व पणतू असा मोठा परिवार आहे. त्यापैकी अरुण केदारे व राजू केदारे हे परिवर्तनवादी चळवळीत कार्यरत असून वडिलांचे निधन झाले.निधनानंतर आपल्याकडे अस्थी विसर्जन करण्याची प्रथा आहे.मात्र त्यामुळे जल प्रदूषण होते.हा प्रथेला फाटा देत त्यांनी वडिलांच्या अस्थी विसर्जित न करता घराजवळच खड्डा करून अस्थी खड्ड्यात दफन करून त्यांच्या स्मृतीनिमित्त वृक्ष लागवड करण्याची संकल्पना मांडली त्यास कुटुंबातील सदस्यांनी सहमती दर्शविली. जलदान व पुण्यामोदन कार्यक्रमाच्या दिवशी घराच्या प्रांगणात सर्व आप्तेष्टांच्या उपस्थित घराजवळ खड्डा करून दिवंगत काळू केदारे यांच्या अस्थी दफन करून त्या ठिकाणी वृक्ष लागवड करून वडिलांच्या स्मृती जपल्या ..
पाण्यात अस्थी विसर्जन केल्याने पाण्याचे प्रदूषण होते.तो रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर वृक्ष लागवड केल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.झाडापासून ऑक्सिजन मिळते व निसर्गचक्रही अबाधित राहते.आणि झाडापासून फळे व फुले मिळत असल्याने वडील कायम स्मरणात राहतील... - अरुण काळू केदारे मुलगा सामाजिक कार्यकर्ते
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या