के आर टी हायस्कूल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
जन आवाज न्युज.संपादक.अफरोज अत्तार.
मनमाड. भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिवाण दिनानिमित्त शाळेत विनम्र अभिवादन करण्यात आले. इयत्ता सातवी व इयत्ता दुसरी च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यावेळेस मुख्याध्यापक दीपक व्यवहारे.उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते .इयत्ता दुसरीच्या अर्णव राजेश भावसार .सृष्टी राजेंद्र संसारे या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली .इयत्ता पहिली ची सायुरी संदीप केदारे या विद्यार्थिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मत मांडले खुशी वाजे या विद्यार्थिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव सुहास जाधव या विद्यार्थ्यांने केले. या विद्यार्थ्यांना प्रवीण आहेर सर व सौ. ऋचा शिंपी या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
0 टिप्पण्या