Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

पैठणीचा सन्मान महिलांचा न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमास मनमाडकर महिलांचा उदंड प्रतिसाद.

 

पैठणीचा सन्मान महिलांचा न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमास मनमाडकर महिलांचा उदंड प्रतिसाद.

जन आवाज न्युज.


सौ अंजुमताई कांदे यांच्या संकल्पनेतून व शिवसेना महिला आघाडीच्या नियोजनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे

आज प्रभाग क्रमांक एक व चार च्या माता भगिनींसाठी चंद्रभागा लॉन्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
सिनेअभिनेता फेम क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर हा प्रसिद्ध मनोरंजनाचा कार्यक्रम यावेळी सादर झाला
याप्रसंगी विविध सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले
क्रांती नाना मळेगावकर यांनी तीन तास मनोरंजन करत विविध खेळ उखाणे प्रश्न उत्तरे या माध्यमातून मनोरंजन केले
चूल आणि मुल यापर्यंत बंदिस्त असलेल्या महिलांच्या जीवनात या तीन तासांचे मोल खूप मोठे आहे आम्ही या तीन तासात खूप आनंद घेतला हसलो, नाचलो खूप आनंदी झालो असे महिलांनी मनोगत व्यक्त केले.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या रूपात आम्हाला साक्षात विठ्ठल भेटला अनेक वर्षांपासून असलेले आमची पाण्याची समस्या करंजवण मनमाड पाणी योजनेच्या माध्यमातून सोडवली हे आम्हा मनमाडकर महिलांसाठी खूप अभिमानाची बाब आहे असं ह.भ.प.सविता पगार यांनी मनोगत व्यक्त केले.
सौ अंजुमताई कांदे यांनी प्रस्तावना करत या कार्यक्रमाचे उद्देश सांगितला. त्याला कित्येक वर्षांपासून मनमाड शहराचा पाणी प्रश्न हा प्रलंबित आहे आणि आमदार झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाडचा पाणी प्रश्न सोडवणार असा निश्चय केला होता आणि मिळालेल्या अत्यंत कमी वेळात शासनाकडे पाठपुरावा करून मनमाड करंजवण पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली लवकरच या योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आणि इतक्या मोठ्या योजनेचे स्वागत करणे ही एक अभिमानाची बाब आहे आणि या योजनेचे स्वागत म्हणूनच हा आनंद उत्सव साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.


याप्रसंगी घेण्यात आलेल्या विविध खेळांमधून विजेत्यांची नावे
प्रथम माधुरी ज्ञानेश्वर नरोटे टीव्ही
द्वितीय शुभांगी मच्छिंद्र फरताळे डिनर सेट
तृतीय सारिका प्रभाकर ठोंबरे ट्रॉली बॅग
योगिता अक्षय पवार पैठणी
सोनी अनिल मिसळ पैठणी
याप्रसंगी कार्यक्रमास उपस्थित लकी ड्रॉ काढण्यात आला यात दहा महिलांना पैठणी भेट देण्यात आली


शालिनी प्रेमनाथ वाघ
रंजना देविदास अहिरे
संगीता जगदीश कुमावत
रंजना अशोक गांगुर्डे 
नेहा श्रीओम गोखले 
भूमिका किरण शेजवळ 
हर्षदा चैतन्य पाटील 
अश्विनी प्रमोद हिंगमिरे 
शिवानी राहुल मगर
विशेष सन्मानित महिला
सौ मंगला सूर्यवंशी सामाजिक क्षेत्र
सौ मंदोदरी पाटील शिक्षण क्षेत्र
सौ डॉक्टर रागिनी भालेराव वैद्यकीय क्षेत्र
सौ. सरीता नानाजी पगारे अपंग क्षेत्र
सौ अर्चना मोरे पोलीस क्षेत्र
सौ तृष्णा अरुण देवरे व्यावसायिक क्षेत्र
सौ अंजली लहाने शिक्षिका
प्रियंका बहोत वैद्यकीय क्षेत्र
डॉक्टर रूपाली पाटील त्वचारोग तज्ञ वैद्यकीय क्षेत्र
सौ सविता प्रवीण सूर्यवंशी रुग्णसेविका क्षेत्र
सौ सोनाली निश्चित शिक्षिका शैक्षणिक क्षेत्र
सौ डॉक्टर स्वाती देवरे वैद्यकीय
सौ संगीता चौधरी सामाजिक क्षेत्र
ऋता विजय गायकवाड समाजसेविका
सौ.प्रियंका अमोल सानप शैक्षणिक
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना मनमाड शहर, शिवसेना महिला आघाडी मनमाड शहर, युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या