नाशिक.चालू वर्षी नाशिक शहरामध्ये हेल्मेट न वापरल्यामुळे रस्त्यावरील अपघातामध्ये ८३ मोटार सायकल स्वारांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे. त्याच प्रमाणे गंभीर अपघातामध्ये २६१ दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झालेले आहेत. कारणांचे विश्लेषण केले असता असे आढळून येते की, बरेच दुचाकीस्वार अपघात झाल्यानंतर रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्यामुळे गंभीररित्या जखमी होतात किंवा रस्त्यावर डोके आपटून फुटल्यामुळे मृत्यू येतो. दुचाकी वाहन चालवित असतांना हेल्मेटचा वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम १९८८, कलम १२९/१७७ नुसार बंधनकारक आहे. हेल्मेट न वापरता दुचाकी वाहन चालविल्यास रु.५००/- दंडाची तरतूद आहे. कायदेशीर बाबी वेगळया परंतु हेल्मेट वापरणे हे वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे. हेल्मेट वापरल्यामुळे दुर्दैवाने अपघात झालाच तर डोक्याला व चेह-याला गंभीर इजा होत नाही. तसेच जीवीत हानी देखील होत नाही हे सर्वश्रुत आहेच. नाशिक शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर पोलीसांनी राष्ट्रीय महामार्ग ३ वर गस्त वाढविली असता प्राणांतिक अपघातांमध्ये ब-यापैकी घट झाल्याचे दिसून आले आहे. आपण असे म्हणू शकतो की वाढविलेल्या गस्तीमुळे काही वाहन चालकांचा जीव वाचलेला आहे. कोणाचा जीव वाचला हे अर्थातच समजून येणार नाही. यापूर्वी देखील हेल्मेट वापराबद्दल पोलीस आयुक्तालयामध्ये वेळोवेळी मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. व त्या त्या वेळी अपघाताच्या संख्येमध्ये, प्राणांतिक अपघातामध्ये व गंभीर दुखापतीमध्ये घट झाल्याचे आढळून आलेले आहे.
गेल्या सहा-सात महिन्यांपासून नाशिककरांच्या स्वभावाबद्दल माझे असे निरीक्षण आहे की, हे शहर कायदा व सुव्यवस्थेचे स्वंयस्फूर्तीने पालन करते. त्यामुळे सुजान नागरिकांना सक्ती करण्याची आवश्यकता पडत नाही.. तथापि दुचाकीस्वारांचे होणारे अपघात व त्यामध्ये होणारी प्राणहानी, गंभीर जखमा व त्यामुळे येणारे अपंगत्व या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणा-यांविरुध्द पोलीसांना नाईलाजास्तव कडक कारवाई करणे क्रमप्राप्त ठरते. नाशिक शहरातील सर्व दुचाकीस्वारांना त्यांनी योग्य प्रतीचे हेल्मेट वापरुन आपले दुचाकी वाहन चालवावे व वाहतूक नियमांचे पालन करावे असे पोलीस विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे. दिनांक ०२ / १२ / २०२२ रोजी पासून नियमभंग करणा-या विरुध्द मोटार वाहन कायदा अधिनियम १९८८. कलम १२९/१७७ अन्वये कारवाई अधिक तिव्र करण्यात येईल.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या