न.प.शाळा क्र.१० मनमाड शाळेत हिवाळी स्पर्धा संपन्न.

‌जन आवाज न्युज.

 मनमाड.न.प.शाळा क्र. 10 मनमाड शाळेत हिवाळी स्पर्धा संपन्न.त्यात प्रामुख्याने लंगडी स्पर्धा, संगीत        खुर्ची,धावणे,पोत्यातील उड्या व चमचा लिंबू इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. लंगडी स्पर्धेत विजयी संघ अनुक्रमे दिप पवार, रोहित शिंदे, अनुष्का कांदळकर,वंश आहिरे,चैताली शिंदे, सिद्धी सांगळे, तेजस्विनी सांगळे, जिविका कल्याणकर,निलेश वाघमारे,वैशाली माळी, हर्षवर्धन पाटील हा संघ विजयी झाला .संगीत खुर्ची मध्ये अनुक्रमे अनुष्का कांदळकर प्रथम, चैताली शिंदे द्वितीय,तेजस्विनी सांगळे तृर्तीय, पायल शिंदे उत्तेजनार्थ तसेच धावणे स्पर्धेत देवेंद्र आहिरे प्रथम, अनिकेत कोल द्वितीय, सिद्धी सांगळे तृतीय, चैताली शिंदे उत्तेजनार्थ, त्याचप्रमाणे पोत्यातील उड्या स्पर्धेत अनुक्रमे हर्षवर्धन पाटील प्रथम, सई खैरनार द्वितीय, यश केदारे तृतीय, शाहरुख पठाण उत्तेजनार्थ.वरिल प्रमाणे स्पर्धा घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षिसे देवून अभिनंदन करण्यात आले.
      स्पर्धांसाठी श्री.प्रमोद दौलतराव पाचोरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुनिल सांगळे व श्री नितीन शिक्केनिस, सौ.लिलावती शिक्केनिस तसेच श्री. देवेंद्र पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्पर्धां यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्ग अनुकमे श्री. बि.के.गवळी, श्री.एस.एस. नाईकवाडे व श्रीमती. वाय.एस. आहिरे  यांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केल्या.