जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत,१४ वर्षाखालील ६२ किलो वजनी गटात अश्विनकुमार गितेची उत्तम कामगिरी, कुस्तीसाठी विभागीय पातळीवर निवड झाली,
जन आवाज न्युज
मनमाड.भगूर येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २५ नोव्हेंबर २०२२ रोजी बलकवडे व्यायामशाळा येथे पार पडल्या. या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मनमाड येथील कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूलचा विदयार्थी अश्विनकुमार प्रल्हाद गिते या विदयार्थ्यांने १४ वर्षाखालील व ६२ किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अतिशय चमकदार कामगिरी केली. त्याच्या ६२ किलो वजनी गटातील सर्व सामन्यात अत्यंत चुरशीची लढत देवून आपल्या बुध्दी आणि शक्ती यांचा मेळ घालत व उत्तम पकड आणि डाव टाकत शेवटी अंतिम सामन्यात मजल मारली आणि अंतिम सामना जिंकला. त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे त्याची कुस्तीसाठी विभागीय पातळीवर निवड झालेली आहे.
अश्विनकुमार गिते यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व विभागीयस्तरावरील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अश्विनकुमार गिते हा वीर सावरकर जिमखान्यात सराव करीत असून त्याला शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. विशाल झाल्टे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या