Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कै.भागिनाथ मंडलिक एक आदर्श व्यक्तिमत्व-आण्णासाहेब महाराज आहेर.

 

कै.भागिनाथ मंडलिक एक आदर्श व्यक्तिमत्व-आण्णासाहेब महाराज आहेर. 

जन आवाज प्रतिनिधी.संतोष गायकवाड.

 ‌ नाशिक- जीवन जगत असताना कार्यामुळे कर्तृत्व,दानामुळे दातृत्व,ज्ञानामुळे ज्ञातृत्व शिल्लक रहात असते,तसं कै.भागिनाथ मंडलिक देहरुपान आज व्यक्ती म्हणून जरी ते  गेले तरी त्यांच व्यक्तिमत्त्व मात्र शिल्लक आहे,त्यांनी एक मुलगा शेतीनिष्ट तर दुसरा एमबीए करुन मुलांवर   माणुसकी,कष्टाळु,धार्मिक व सेवाभावी कतृत्वाचे संस्कार केले,असे भावोद्गार वारकरी महामंडळ नाशिकचे अध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी अशोकनगर सातपूर येथे काढले,ते कै.भागिनाथ निवृत्ती मंडलिक वाहेगांवकर यांना गरुड पुराण कथेतून प्रवचन प्रसंगी श्रद्धांजली वाहताना बोलत होते,भागिनाथ मंडलिक हे मितभाषी,निगर्वी, प्रेमळ,शांतस्वभावाचे, सेवाभावी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे, अजात शत्रु, मोठ्या मनाचा,एक खंबीर,सात्त्विक,दिलदार,कोमल हृदयाचा,माणुसकी जपणारा, सत्यवादी,तत्त्वनिष्ठा जपणारा माणुस म्हणजे भागिनाथ मंडलिक होते असे ही हभप आहेर म्हणाले, त्यांचे पाठीमागे पत्नी मिराबाई भागिनाथ मंडलिक,प्रकाश निवृत्ती मंडलिक,दिलीप निवृत्ती मंडलिक,सुनिल निवृत्ती मंडलिक हे तीन भाऊ,उषाबाई वाल्मिक खैरे, मंगल राजाराम आहेर,लताबाई गंगाधर आहेर या बहिणी व पवन भागिनाथ  मंडलिक,महेश भागिनाथ मंडलिक ही दोन मुल तर शालिनी देविदास गांगुर्डे,पुनम संतोष आहेर या दोन मुली तसेच स्वाती पवन मंडलिक,पल्लवी महेश मंडलिक या दोन सुना, आणि आनंदा लक्ष्मण पवार,काशिनाथ लक्ष्मण पवार हे मेव्हणे आहेत,रघुनाथ गोपिनाथ पवार,राहुल प्रभाकर पवार हे आहेत  संतोष,ईशा,तन्वी,विराज,कौशल स्मित असा मोठा परिवार आहे,.   
.यावेळी सप्तश्रृंगी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष बाबुराव खंडेराव भोर, निवृत्ती खैरे,भाऊसाहेब महाडीक,बापू देवरे,योगेश भागिनाथ गावडे,महिला वारकरी भजनी मंडळ धृवनगर अध्यक्षा सुमनताई शिंदे, वारकरी महामंडळ नाशिक संपर्कप्रमुख शरद महाराज थोरात,आमदार सिमाताई महेश हिरे,खासदार हेमंत गोडसे, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, नगरसेवक शशिकांत जाधव,मा.नगरसेक सदाशिव माळी दादा,मा.नगरसेक नंदु शेठ जाधव,नगरसेविका इंदुबाई सुदाम नागरे, माधुरीताई गणेश बोलकर,विक्रम आण्णा नागरे, समाजसेवक दिपकजी मौले,जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव,रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी ही शोक प्रगट करुन दुःख व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या