Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

दिवाळीच्या सणामध्ये एवढी झाली एसटी बसची भाडे वाढ

 

दिवाळीच्या सणामध्ये एवढी झाली एसटी बसची भाडे वाढ.

21 ते 31 ऑक्टोबर,  दरम्यान एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ. शिवनेरी व अश्वमेध सेवेला भाडेवाढीतून वगळले. 

  मुंबई-( दि.14) एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने  30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे.  त्यानूसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही दि.20.10.2022 व 21.10.2022 रोजीच्या मध्यरात्री 00.00 नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांना सुधारित 10 टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड 31 ऑक्टोबर, 2022  पर्यत राहील. सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी  बसेसला लागू राहील. *शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.*
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे , त्या प्रवाशाकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल.
तथापी, ही भाडेवाढ एस.टी. च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व  विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही.
1 नोव्हेबर पासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी. महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या