Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

आमदार आपल्या दारी' ही संकल्पना आमदार कांदे यांनी आज प्रत्यक्षात उतरवली.

 

मनमाड : आमदार आपल्या दारी या मोहिमेत बोलतांना आमदार सुहास कांदे, आमदार पत्नी अंजुम कांदे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे इतर अधिकारी 

  

मनमाड ता ६ : आमदार हा जनतेचा सेवक आहे त्यामुळे कोणत्याही अडीअडचणी निसंकोच सांगा, हक्काचा माणूस म्हणून हाक द्या, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्यापासून ते शिवसैनिकापर्यंत आणि सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी तुमच्यासाठी काम करतील असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी येथे व्यक्त केले राज्यातील पहिलाच प्रयोग असलेला  'आमदार आपल्या दारी'  ही संकल्पना आमदार कांदे यांनी आज प्रत्यक्षात उतरवली. 

मनमाड : आपली समस्या मांडतांना महिला 


मनमाड : तक्रारी नोंदवतांना नागरिक 


नांदगाव विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे  आमदार सुहास कांदे यांच्या संकल्पनेतून 'आमदार आपल्या दारी'  या उपक्रम मोहिमेला आज मनमाडमध्ये सुरुवात झाली. नांदगावचे तहसिलदार सिद्धार्थ मोरे यांच्या हस्ते मोहमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार पत्नी अंजुम कांदे, युवा जिल्हा प्रमुख फरहान खान, ज्येष्ठ नेते अल्ताफ खान, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, तालुका आरोग्य विभागाचे डॉ संतोष जगताप, महावितरणचे कार्यकारी उपअभियंता संदीप शिंदे, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी नितनवरे, बांधकाम खात्याचे अधिकारी श्री खैरनार, कृषी विभागाचे श्री पवार उपस्थित होते. यावेळी आवाहन करतांना आमदार कांदे बोलत होते एखाद्या प्रभागात रस्ता नाही, लाईट नाही, नाले सफाई केली जात नाही, कचरा उचलला जात नाही, स्वच्छता केली जात नसेल, रेशनवर धान्य मिळत नसेल,  उपजिल्हा रुग्णालयात उपचार मिळत नसतील, वाढीव वीज बिल यासह कोणतीही समस्या, प्रश्न, अडीअडचणी असतील थेट संपर्क साधा आमच्याकडे तक्रार नोंदवा तात्काळ त्यावर उपाय शोधून आपल्या समस्या सोडवल्या जातील इतकेच नव्हे तर उच्चशिक्षणासाठी जायचे असेल तर बायोडाटा द्या आम्ही तजवीज करू, नोकरी हवी असेल तर नाशिक येथे कंपनीमध्ये प्रयत्न करून रोजगार शिक्षणाकडे देखील लक्ष दिले जाईल त्यामुळे मनमाड शहरातील नागरिकांनी आपल्या समस्या द्या त्या सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करू असे या आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले पालिका, वीज, बांधकाम, पोलीस, आरोग्य या विषयीच्या तक्रारींचे निराकारण जागीच व्हावे यासाठी आणि त्या तातडीने मार्गी लागाव्या या उद्देशाने प्रत्येक विभागात आमदार आपल्या दारी हा उपक्रम शहरातील प्रत्येक भागात तालूक्यातील शासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत राबविण्यात येणार असल्याच आमदार सुहास कांदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा संघटक राजेंद्र भाबड, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, तालुका संघटक संजय कटारिया, जाफर मिर्झा, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, नगरसेवक पिंटू शिरसाठ, विनय आहेर, दिनेश घुगे, शहर संघटक महेंद्र गरुड, पिंटू वाघ, निलेश व्यवहारे, सुभाष माळवतकर, गोटू केकान, मुन्ना दरगुडे, अमीन पटेल, सचिन दरगुडे, अंकुश गवळी, सिद्धार्थ छाजेड, योगेश इमले उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरप्रमुख महेश बोरसे तर सूत्रसंचालन नाना पाटील, अनिल दराडे यांनी केले.


आमदार सुहास कांदे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने नांदगाव विधानसभा मतदार संघातील जनतेच्या अडचणी सातत्याने सोडवण्यास प्राधान्यक्रम देण्यासाठी जनता व आमदार यांच्यामधील दुरी कमी व्हावी तळागाळातील समस्या जाणून घेणे या समस्या समक्ष जनतेला भेटून समजून घेणे या उद्देशाने आमदार सुहास कांदे यांनी आमदार आपल्या दारी या मोहिमे अंतर्गत शहरातील गुरुकुलवाडी, माऊली नगर, किर्ती नगर, कोतवाल नगर, सिकंदर नगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, तिरंगा नगर, गौतम नगर या प्रभागातील नागरिकांना भेटत त्यांच्या समस्या जाणून ऐकून घेतल्या 

नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या माईकवर निःसंकोचपणे मांडल्या या समस्येबाबत तक्रार अर्ज लिहून घेतले जात होते त्यामुळे जागेवरच तात्काळ संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ उत्तरे देत समस्या मार्गी लावल्या जात असल्याचे चित्र दिसत होते 

आमदार आपल्या दारी या कार्यक्रमात जवळपास १७२  नागरिकांच्या समस्या तक्रार अर्ज दाखल झाले. यावेळी नगरपालिकेच्या कर्मचारी चकोर यांचे सेवेत असताना कोरोनामुळे निधन झाले होते याप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांचा धनादेश आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते देण्यात आला.

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या