Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश करंजवन मनमाड पाणीपुरवठा योजना २५७ कोटी ऐवजी आता ३११.८० कोटी रुपये नव्याने मंजूर, सदर योजनेस लोकवर्गणीतुन १५% टक्के भरवायची रक्कम देखील माफ व्हावी निवेदनद्वारे मांगणी,

 




मनमाड ता ६ : मनमाड शहरासाठी जीवनवाहिनी अर्थात संजीवनी असलेल्या करंजवन पाणीपुरवठा योजनेने गती घेतली आहे आमदार सुहास कांदे यांच्या मंत्रालयातील पाठपुराव्याला यश आले असून करंजवन मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव निधीला मंजूरी मिळाली आहे त्यामुळे २५७ कोटीची योजना आता नव्याने वाढीव किंमत ३११.८० कोटी रुपये करण्यात आली आहे. 
मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आमदार सुहास कांदे यांनी  शासनाकडे सतत पाठपुरावा करून योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. मनमाड शहरासाठी अत्यंत महत्वाची असलेल्या करंजवन पाणीपुरवठा योजना शासन दरबारी मंजूर झाली आहे मात्र त्यानंतर आजच्या स्थितीला अनेक वस्तूंच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली असून योजना अंतिम टप्प्यावर असताना मंजूर झालेली किंमत तसेच आता कामासाठी प्रत्यक्ष लागणारा खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली होती. सदर परिस्थिती आमदार सुहास कांदे यांनी प्रशासनासमोर मांडत वाढीव निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे  सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर आज करंजवन पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास  कांदे यांना दिली. याआधी योजनेची मंजूर किंमत २५७ कोटी रुपये होती, आणि आता नव्याने वाढीव किंमत ३११. ८० कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे. आमदार सुहास कांदे यांनी तालुक्यातील समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहे. त्यामुळे करंजवण पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच करंजवन योजनेसाठी मंजूर झालेल्या निधी मध्ये १५  टक्के लोकवर्गणी भरावयाची असल्याने सदर लोकवर्गणी माफ व्हावी यासाठी देखील  आमदार सुहास कांदे यांनी विनंती केली असता मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. 
मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या निविदा आठवड्याभरात निघणार असून लवकरच या योजनेचा शुभारंभ होणार असल्याने जनतेसाठी ही एक अतिशय आनंददायी बाब आहे. त्यामुळे मनमाडकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. यानिमित्ताने मनमाडकरांना दिलेला शब्द पाळला असून लवकरच कामाचा शुभारंभ केला जाईल असेही आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या