Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...


 लोकशाहीत होतोय जनतेचा छळ ? सरकारच्या डुप्लीकेट नीती मुळे सामांन्याचे जगणे झाले असह्य !!


लोकशाहीचा अपमान जेवढा हल्लीच्या काळात होत आहे तेवढा कधीही झाला नाही. सरकार कोणाचेही असो, तो प्रश्न अलाहिदा ! मात्र सत्तेसाठी होत असलेल्या राजकीय ओढाताणीमुळे सामान्य माणूस भरडला जात आहे हे नक्की. एकीकडे गरीब जनता गॅस कनेक्शन घेवू शकत नाही म्हणून सरकार उज्वला योजने द्वारे मोफत गॅस कनेक्शन वाटत आहे, तर दुसरीकडे गॅस सिलेंडर रिफीलचे दर गगनाला भिडतील एवढे वाढवीत आहे. जो व्यक्ती आपली चुल पेटविण्यासाठी लाकडे आणू शकत नाही यासाठी कोरड्या उसाचे सरपण म्हणून वापर करीत होता तो महागडे सिलेंडर कसे घेईल ? लॉकडाऊनच्या चक्कित भरडला गेलेला सामान्य नागरिक कसेबसे पायावर उभे राहण्याचा प्रयत्नात असतांना पेट्रोल, डीझेल, नित्योपयोगी वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे महागाईच्या आगीत पुन्हा होरपळला जात आहे आणि शासन हे उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा मुकदर्शक म्हणून गप्प बसले आहे. गरिबांच्या मरणासन्न यातनेची या पाषाण हृदयी शासनाला काहीच पडली नाही. काहींच्या मते पेट्रोल डीझेलचे दर केंद्राने वाढवले तर काहींच्या मतानुसार राज्याने वाढवले. आता कर्ता-करविता कोणीही असो, मरतोय तो सामान्य माणूसच ! प्रवास महागला, खाद्यतेलाचे भाव वाढले, शाळा सुरु नव्हत्या तरी खाजगी शाळा विद्यार्थ्यांच्या फी साठी पालकांना धारेवर धरले जात आहे, घेतलेल्या कर्जाच्या परतफेडी साठी बँका, पतपेढ्या, खाजगी सावकार, खाजगी फायनान्स, वसुलीसाठी सक्ती करत आहेत. कंपनी कडून लाईफटाईम म्हणून दिले गेलेले मोबाईलच्या सिमकार्ड रिचार्ज साठी आता दरमहा अव्वाच्यासव्वा मासिक दर आकारून उघडपणे जनतेची फसवणूक करीत आहेत. एवढे असूनही सरकार किंवा तथाकथित जनतेचे कैवारी नेते, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार कोणीही याची दखल घेवून विरोध करतांना दिसत नाहीत. जनतेवर सर्वत्र अन्याय ! अन्याय !! आणि अन्यायच होत आहे. आमदार, खासदार त्यांचे मानधन वाढवण्यासाठी, निधीच्या वाढीसाठी आपली सर्व शक्ती एकत्रित करून स्वत:चा स्वार्थ साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र ज्या मतदारांनी त्यांना आपले अमुल्य मत देवून, त्यांच्यावर विश्वास ठेवून ज्यांना निवडून दिले त्यांना यांनी मरणासन्न यातना भोगण्यासाठी हवेवर सोडून दिले. कोणीही विरोध करायला तयार नाही. एकही राजकीय पक्षाने जनतेचा कैवारी म्हणून महागाई विरोधात तीव्र आंदोलन केले नाही. फक्त देखाव्यासाठी धरणे आंदोलन करून भारतीयांची दिशाभूलच केली आहे. थोड्याथोड्या गोष्टींसाठी नेहमी आमरण उपोषण पुकारणारे सामाजिक कार्यकर्ते कुंभकर्णी झोपेत आहेत. जनतेच्या यातनेची त्यांनाही जाणीव नाही ही लज्जास्पद बाब आहे. केंद्राची सर्व शक्ती राज्यसरकार कसे कोसळेल यासाठी पणाला लावली जात आहे तर राज्यसरकार आपली सत्ता कशी टिकवता येईल याकडे संपूर्ण शक्ती पणाला लावत आहे. यात सामान्य माणसाच्या गरजा, संकट, यातना, फरफट कोणालाही दिसत नाही किंवा दिसत नसल्याचे सोंग घेतले जात आहे. आता जनतेनेच पक्षवाद, जातीयवाद सोडून न्यायासाठी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या