भारतीय ज्युनिअर मुलींच्या प्रशिक्षक म्हणून जय भवानी भवानी व्यायाम शाळेची खेळाडू व एन आय एस कोच तृप्ती शेखर पाराशर हिची निवड.
बातमी साठी संपर्क.आफरोज अत्तार.8888509003
मनमाड प्रतिनिधी.
मनमाड.हेराक्लिओन ग्रीस येथे होणाऱ्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय ज्युनिअर मुलींच्या प्रशिक्षक म्हणून जय भवानी भवानी व्यायाम शाळेची खेळाडू व एन आय एस कोच तृप्ती शेखर पाराशर हिची निवड करण्यात आली आहे 29 एप्रिल ते 12 मे दरम्यान हेराक्लिओन ग्रीस येथे होणाऱ्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून निवड झालेली तृप्ती पाराशर ही महाराष्ट्राची व नाशिक जिल्ह्यातील व मनमाड च्या क्रीडा इतिहासात तील वेटलिफ्टिंग या खेळाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षक म्हणून निवड झालेली पहिलीच प्रशिक्षक ठरली आहे,समस्त मनमाड कर तसेच महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची बाब असून उत्कृष्ट खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असलेली तृप्ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणून छाप पाडण्यास सज्ज झाली आहे.आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल तृप्ती चे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन तृप्तीस लाभले असून,आपला खेळाडू प्रशिक्षक होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत असल्या बद्दल मनमाड मधील सर्व वेटलिफ्टिंग च्या खेळाडूंनी तृप्ती चे मनपूर्वक अभिनंदन केले असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या