Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित "भिमोत्सव 22"ला आज पासुन सुरवात....



मनमाड : महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भिमोत्सव 22"ला आज पासुन सुरवात झाली.

  आज दिनांक 11 जानेवारी शाहीर प्रसाद विभुते शाहीर जलसा , दिनांक 12 जानेवारी जागर समतेचा एल्गार सांस्कृतिक मंच मुंबई आणि दिनांक 16 जानेवारी भीमा तुझ्या जन्मामुळे महानाट्य या अतिषय नावाजलेल्या कार्यक्रमांचे आयोजन भिमोत्सव समितीच्या वतीने मनमाडकरांसाठी करण्यात आले आहे.

   गेल्या अनेक वर्षांपासून शहरामध्ये समितीच्या वतीने नागरिकांच्या प्रबोधनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असुन , याद्वारे  मनमाडकरांना सुंदर कार्यक्रमांची पर्वणी मिळत आहे.

  या सर्व कार्यक्रमांना मनमाड शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान भिमोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या