के आर टी मध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा.
मनमाड.येथील के. आर. टी शाळेत रथसप्तमीचे औचित्य साधून सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. मार्गदर्शक शिक्षक विशाल झाल्टे यांनी विद्यार्थ्यांनकडून सूर्यना प्रात्यक्षिका सह सूर्यनमस्कार वैष्णवी पाटोळे, जीवांशा कागे तन्वी जाधव या विद्यार्थ्यांनीने करून दाखविले आणि विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. सूर्य नमस्कार हा परिपूर्ण व्यायाम असल्याचे सांगण्यात आले.
आपले आरोग्य सुदृढ व चांगले राखण्यासाठी सूर्यनमस्काराची नियमितपणे गरज असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कारास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रथसप्तमी या जागतिक सूर्य नमस्कार. दिनी या निमित्ताने सर्वांनी सूर्यनमस्कार शिका. करा व दुसऱ्यांकडूनही पुरून घ्या. कारण सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायाम आहे. यामुळे आपण आपल्या आरोग्याबाबत सावध होऊ व इतरांनाही सावध करु" करो योग, रहो निरोग असे आवाहन शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी केले. वैभव कुलकर्णी, धनजय निंभोरकर, विशाल झाल्टे ,यांनी संयोजन केले. त्यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या