Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड  : शेंडीच्या डोंगरावरून दोन ट्रेकरांचा खाली पडून जागीच मृत्यू  तर एक तरुण जखमी झाला असून इतर १२ जण सुखरूप .



मनमाड प्रतिनिधी.

मनमाड :- मनमाड शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि गिर्यारोहकांचे आवडते ठिकाण हळबीची शेंडी अर्थात अंगठ्या डोंगरावरून प्रस्तरारोहण करतांना खाली पडून दोन ट्रेकर्सचा मृत्यू झाला तर एकजण जखमी आहे आणि इतर १२ ट्रेकर्स सुखरूप आहेत.

याबाबत वृत्त असे की अहमदनगर येथील असलेले इंद्रप्रस्थ टेकर्स या ग्रुपचे एकूण १५ सदस्य हे आज सकाळी मनमाड शहराजवळ असलेल्या हडबीची शेंडी, (थमसप) म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आले होते या ग्रुपमध्ये ८ मुली तर ७ मुले होते यातील मुलांमध्ये दोन जण सराईत ट्रेनर होते सकाळी शेंडीच्या डोंगरावर पायथ्यापासून चढाई करण्यास सुरुवात केली यातील दोघे ट्रेनर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ या दोघांनी ग्रुपमधील सर्वांची वर चढण्यासाठी असलेल्या जुन्या बोल्डिंगवर रोप लावला होता रोपद्वारे सर्वजण सुखरूप शेंडीच्या डोंगरावर चढले सर्वांनी वर चढल्यावर आंनद व्यक्त केला मनसोक्त फोटो काढले मात्र परतीच्या मार्गावर असतांना यातील ८ मुली ४ तरुण खाली उतरले मात्र पाठीमागे थांबलेले दोघे ट्रेनर बोल्डिंग मधून रोप काढत असतांना वरचे बोल्डिंग दगड ठिसूळ असल्याने सटकल्यामुळे ट्रेनर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ हे दोघे डोंगरावरून खाली पडले गेले तर यांच्यासोबत असलेला प्रशांत पवार हा तरुण देखील जखमी झाला हे दोघे खाली पडत असतांना डोंगरावर जाणाऱ्या काही व्यक्तींनी बघितले त्यांनी तात्काळ फोन फिरवत रापली, कातरवाडी येथील तरुणांना बोलावून घेतले अपघात झाल्याचे लक्षात येताच सदर गावातील आणि मनमाड शहरातील तरुण घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत यातील एका मृताला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले तर दुसरा व्यक्तीला रेस्क्यू करण्यात वेळ लागल्याने अंधार पडल्यावर सदर मृत तरुणाला शोधण्यात यश आले आणि तेथून एम्ब्युलन्सने मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे जखमी प्रशांत पवार याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे तर यातील १२ तरुण तरुणींना रापली येथे माजी सरपंच संघरत्न संसारे यांच्या ग्रुपने राहण्याची खाण्याची व्यवस्था केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या