Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...


ता १५ : मनमाड - नांदगाव शहरात पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी बनविण्याचा मानस आहे असे सूतोवाच आमदार सुहास कांदे यांनी प्रथम सत्रात तर 


नांदगाव तालुक्यातील पत्रकारांनी निस्पृह आणि विश्वासार्ह पत्रकारता केली. सध्या पत्रकारतेतील बदलत्या प्रवाहातही त्यांनी ह्याच भावनेतून काम करावे, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री ना. दादा भुसे यांनी द्वितीय सत्रात येथे केले.



नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार गुणगौरव व कार्यशाळा तसेच उत्कृष्ट पत्रकारता वितरण समारंभाच्या सत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुहास कांदे होते. आज अत्यंत धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळामध्ये माध्यम प्रतिनिधी काम करत असतो. अशा पत्रकारांचा सन्मान करणे हे पत्रकारांच्या जीवनात आनंद देणारे क्षण आहेत. आजच्या आधुनेकतेच्या काळात आधुनिकतेबरोबर पत्रकारांची जबाबदारी वाढली असल्याचे ना भुसे यांनी स्पष्ट केले. आमदार सुहास कांदे यांनी ही तालुक्याच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला. पत्रकार संघाचे तालुका समन्वयक अमोल खरे यांनी पत्रकारांना येणाऱ्या अडचणी, समस्या मांडत पत्रकार संघाची भूमिका स्पष्ट करत प्रास्ताविक केले. ना. दादा भुसे व आमदार कांदे यांच्या हस्ते उत्कृष्ट लेखन स्पर्धेतील २४ गुणवंत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान पत्रकार गुणगौरव व कार्यशाळा कार्यक्रमातील प्रथम सत्राचे उद्घाटन नाशिक जिल्ह्यातील नामवंत संपादकांच्या हस्ते करण्यात आले. सकाळचे उत्तर महाराष्ट्र आवृतीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, दिव्य मराठीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, कार्यकारी संपादक अभिजीत कुलकर्णी, महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, आमदार सुहास कांदे, तालुका समन्वयक अमोल खरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नाशिक शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष संपत देवगिरे, ग्रामिण जिल्हाध्यक्ष विश्वास चंद्रात्रे, मार्गदर्शक भास्कर कदम, मोतीराम पिंगळे, नरेश गुजराथी, अशोक परदेशी, सुरेश शेळके आदी व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी पत्रकार कार्यशाळेत उपयुक्त मार्गदर्शन केले. बदलत्या काळात पत्रकारतेचा दर्जा कसा जपावा यावर ही कार्यशाळा रंगली. नांदगाव शहरातील पत्रकारांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत शैलेंद्र तनपुरे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले. कोरोनाच्या परिस्थितीमुळे ग्रामिण वाचक टिकून राहिला पण शहरी वाचक टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. याकडे अभिनीत कुलकर्णी यांनी लक्ष वेधले माध्यमांनी आता वेगवेगळे विषय हाताळावे आणि वस्तुनिष्ठ बातमीसाठी प्रयत्न करावे, असे आव्हान त्यांनी केले. जयप्रकाश पवार यांनी विश्वार्य पत्रकारतेवर लक्ष वेधले. सकाळचे उत्तर महाराष्ट्र आवृतीचे संपादक राहुल स्नाळकर यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन झाले. सध्या मुद्रीत, इलेट्रॉनिक, मिडिया असे अनेक माध्यम आहे. आणि प्रत्येक जण ऑनलाईन आहे. पण परस्परातील संवाद कमी झाला आहे. विसंवाद वाढत आहे. संवाद साधण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. वेळ देत नाही. ही सामाजिक गंभीर बाब रनाळकर यांनी व्यक्त केली. सध्या अनेक नविन माध्यम आहेत. त्याचा अंगीकार करावा असे आव्हान त्यांनी केले. आमदार सुहास कांदे यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारतेच्या कार्याचा आढावा घेतला पत्रकारांनी योग्य आयोग्य काय आहे हे परखडपणे मांडावे, असे आव्हान त्यांनी केले. या दोन्ही सत्रातील कार्यक्रमात नांदगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका पत्रकार संघातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन पत्रकार संदीप देशपांडे यांनी केले. आभार पत्रकार संदीप जेजुरकर यांनी मानले 




 
मनमाड : नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलतांना कृषिमंत्री ना दादा भुसे, आमदार सुहास कांदे, तालुका समन्वयक अमोल खरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या