Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

कातरणी येथील ग्रामसेविका लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात.

मनमाड ता १० : शेतकऱ्यांचे अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकडून नऊशे रुपयांची लाच स्विकारताना
कातरवाडी (ता चांदवड) येथील ग्रामसेविका अनिता कुटेमाटे यांना मनमाड येथे लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडत अटक केली याबाबत मनमाड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतात उभे असलेले पीक पूर्ण उध्वस्त झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी असलेला घास हिरावून घेतला आहे या नुकसानीचे भरपाई शेतकऱ्यांना शासनाकडून दिली जात असून यासाठी ग्रामसेवकाकडे अनुदान मिळावे यासाठी गेले असता फिर्यादी यांना अनेकदा चकरा मारण्यास लावून ग्रामसेवक अनिता कुटेमाटे यांनी फिर्यादीकडे पैशाची मागणी केली याबाबत एक हजार मागितले असता नऊशे रुपयांवर ठरले असता फिर्यादी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साफळा रचत सानप कॉम्लेक्स येथे नऊशे रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले याबाबत ग्रामसेवक अनिता कुटेमाटे यांना अटक केली असून मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या