Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 भविष्य काळाच्या प्रगतीसाठी भावी पिढी व्यसनापासून दूर राहणे काळाची गरज--
राजेंद्र धिंगान


प्रतिनिधी.आफरोज अत्तार.


समाजात सद्यस्थितीत सुरू असलेल्या तरुण वर्गांच्या व्यसनामुळे भावी पिढी चे अतोनात नुकसान होत असून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला व्यसन जडू नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे यासाठी आपले मन खंबीर असणे तितकेच महत्त्वाचे आहे. भावी जीवन सुखी समाधानी जगायचे असेल तर प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहण्यासाठी स्वकेंद्रित मानसिकता बदलण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे असे विचार कामगार श्रेत्र पत्रकार राजेंद्र धिंगान  यांनी व्यक्त केले आहे.
   खरंतर व्यसन कोणतं ही असो ते वाईटचं असतं ज्यामुळे माणसाचं शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडून जात.. आणि व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला सदैव याचा मनस्ताप सहन करावा लागतो...      व्यसन म्हंटल की आपल्या सर्वांना वाटतं की दारू पिणं, सिगारेट ओढणं, तंबाकू गुटखा खाणं, अंमली पदार्थांचं सेवन करणं या आणि अशा अनेक गोष्टी आहेत जे व्यसन प्रकारात मोडतात.परंतु आज आपण अशा एका व्यसनावर बोलणार आहोत ज्याचं नाव आहे *तुलना*  हो हो तुलना.तुलना करणं हे देखील एक व्यसनच आहे... आणि हे व्यसन करणाऱ्यांची संख्या तर वरील व्यसनं करणाऱ्या लोकांच्या पेक्षा खूप जास्त आहे.. वरील सर्व व्यसनांच्या पेक्षा तुलना करण्याचं व्यसन हे जास्त घातक आहे.. हे व्यसन एकदा लागलं की आपण आपलं सुख, समाधान, शांती सर्व गोष्टी पासून दूर जातो.. वरील व्यसनांसाठी आपला पैसा खर्च होत असतो पण तुलनेच्या व्यसनात आपण आपलं सर्वस्व खर्च करत असतो.. कदाचित वरील सर्व व्यसन दूर करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र आहेत पण तुलनेच्या व्यसनाच मुक्ती केंद्र नाही...दारू तंबाकू सिगारेट या व्यसनामुळे आपले शारीरिक स्वास्थ बिघडते पण तुलनेच्या व्यसनामुळे आपले मानसिक स्वास्थ बिघडतेआणि ते देखील सदैव. 
मित्रांनो जगातील सर्वात वाईट व्यसन आहे तुलना करणं. जेव्हा आपण कुणाशी आपली तुलना करतो त्या वेळी आपण स्वतःचा अपमान करतो, स्वतःच्या क्षमता, स्वतःची सर्वांगीण परिस्तिथी, स्वतःचा सर्वांगीण स्तर याकडे जाणीव पूर्वक आपली डोळे झाक करतो. आणि समोर दिसते ते फक्त इतरांनी आपल्यापेक्षा मिळवलेले जास्त यश, मग ते कोणत्या ही विषयात असेल कोणत्या ही क्षेत्रात असेल... आपण का कमी पडलो हा विचार करण्या पेक्षा तो का पुढे गेला याचाचं आपण जास्त विचार करत असतो आणि आपली अस्वस्थता वाढते आणि मग या व्यसनाचा परिणाम दिसायला लागतो.... 
   मित्रांनो दारू असो तंबाकू असो सिगारेट असो या व्यसनांची नशा काही वेळे पुरती असते आणि त्याचा परिणाम संपला की माणूस परत आपल्या मुळ स्तिथीत येतो पण तुलना हे असं व्यसन आहे ज्याची नशा सतत आपल्या मनात कायम असते.. त्या मुळे या व्यसनाचा परिणाम हा भयानक असतो प्रसंगी आपल्या हातून घडू नयेत अशा गोष्टी देखील या व्यसना मुळे घडतात आणि क्षणार्धात आयुष्य होत्याच नव्हतं होऊन जात. या व्यसना पासून दूर राहणं खूप कठीण आहे..पण अशक्य नाही.. आपल्याला या व्यसना पासून दूर राहायचं असेल तर आपण इतरांच्याकडे पाहून त्यांच्या यशाची तुलना करण्यापेक्षा.आपण वेगळे आहोत, विशेष आहोत, आपला रंग वेगळा आहे, आपला स्वभाव वेगळा आहे, आपलं रूप वेगळं आहे, आपलं सारचं वेगळ आहे.. स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेतुन पाहण्यापेक्षा स्वतःच्या नजरेतून बघूया समाजात आपल्या ही मताला महत्त्व आहे, आपले विचार महत्त्वाचे आहेत, एखाद्या गोष्टीबद्दल आपलं निरीक्षण आणि समीक्षण इतरांच्या पेक्षा वेगळे असू शकत यालाही महत्त्व आहे.आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारू या, स्वतः स्वतःचे कौतुक करुया.. लक्षात ठेवा एका मोठ्या रकमेतून एखादे शून्य काढले तर ती रक्कम किती लहान होईल, म्हणजे शून्यालाही महत्त्व असतंच.म्हणून आपल्यात काय वेगळं आहे ते ओळखून त्या प्रमाणे स्वतःमध्ये बदल करावे लागतील..या साठी तज्ञ लोकांचे मार्गर्शन घ्यावे लागेल. अध्ययत्माकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहावे लागेल... कदाचित पहिल्या प्रयत्नात हे यश मिळेलंच असं नाही पण जाणीवपूर्वक हे प्रयत्न सातत्याने चालू ठेवले तर आपण या तुलनेच्या व्यसनाच्या आहारी न जाता आपण देखील हे यश प्राप्त करू शकतो... फक्त गरज आहे ती आपली संयम वाढवण्याची ,स्वकेंद्री मानसिकता बदलण्याची, आणि दृष्टी नव्हे तर दृष्टिकोन बदलण्याची...

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या