आईच्या दशक्रिया विधीकार्यक्रमात वृक्षरोपण करून जीवनात आठवण सदैव जीवंत ठेवण्याचा उपक्रम
जीवन मरण हे नैसर्गिक चक्र आहे,जो जगात जन्मला त्यास जग सोडावे लागते, परंतु आई गेल्यावर आईची आठवण हे आयुष्यभर जात नाही,
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.8888509003.
मनमाड नगर परीषदेचे लिपीक श्री राजेंद्र दादा भाबड यांच्या मातोश्रीच्या दशक्रिया विधी होता, त्यावेळी दशक्रिया विधीसाठी आलेल्या नातेवाईक, मित्रपरिवार यांना वेगवेगळ्या प्रकारचे 251वृक्ष व 501 हनुमान चाळीसाचे वाटप करण्यात आले, तसेच गोदावरी माता मंदिराच्या आवारात किर्तनकार योगेश महाराज शिंदे कोळपेवाडीकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
निसर्गाचे संगोपन व्हावे व अध्यात्मिक कडे जनतेचा कल जास्तीत जस्त वाढावा त्यामुळे येणारी भारतीय पिढी संस्कारमय घडावी हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला .या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे,

0 टिप्पण्या