उपविभागीय अधिकारी मनमाड यांचे उपस्थितित मौलाना, मुस्लिम पंचकमिटी, प्रतिष्ठित नागरिक, शांतता समिती सदस्य यांची बैठक संपन्न
मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीत आगामी मुस्लिम बांधव यांचा साजरा होणारा रमजान ईद उत्सव अनुषंगाने आज दि. 11/05/2021 दुपारी 16-00 ते 17-00 वाजेपर्यंत मनमाड शहर पोलीस स्टेशन प्रांगणात मा.श्री. समिरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड विभाग मनमाड यांचे उपस्थितित मौलाना, मुस्लिम पंचकमिटी, प्रतिष्ठित नागरिक, शांतता समिती सदस्य यांची बैठक घेण्यात आली. बैठकीस 35 ते 40 मुस्लीम बांधव कोरोना संसर्ग अनुषंगाने सोशियल डिस्टन्सचे पालन करून उपस्थित होते.
बैठकी दरम्यान उपस्थितांना शासनाने रमजान ईद संदर्भात दिलेले मार्गदर्शक सूचना समजावून सांगून मशीद तसेच मोकळ्या जागी नमाज पठण करिता एकत्र येऊ नये, आपापल्या घरात नमाज पठण करावे, बाजारात खरेदी करिता गर्दी करू नये , सार्वजनिक ठिकाणी 05 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ नये बाबत सूचना दिल्या. उपस्थित मुस्लिम बांधव यांनी त्या सूचना समजून घेऊन शासनाचे नियमाचे उल्लंघन होणार नाही याबाबत आश्वासन दिले व बैठक शांततेत पार पडली.या वेळी मनमाड शहर सर्व मस्जिद ईमाम व टष्ट्री,फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मचं चे फिरोज शेख राहत फाउंडेशन तर्फे कयाम सैय्यद व इतर उपस्तीत होते,



0 टिप्पण्या