मनमाड : मनमाड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधून अभूतपूर्व विक्रमी १९४७ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवणारे युवा नगरसेवक अमीन पटेल यांचा प्रभागातील नागरिकांनी आज भव्य आणि भावपूर्ण सत्कार करून गौरव केला. शाल, पुष्पगुच्छ, पुष्पहार आणि मनापासून दिलेल्या प्रेमाने सजलेल्या या सत्कार समारंभात प्रभागातील प्रत्येक घराने उत्साहाने सहभाग घेतला.
या सत्काराचा सर्वात सुंदर आणि हृदयस्पर्शी क्षण ठरला तो चिमुकली जैनब अत्तारच्या हातून अमीन पटेल यांना मिळालेला सत्कार. केवळ ७-८ वर्षांच्या या लहान मुलीने अमीन काकांना शाल ओढून, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. जैनबच्या निरागस भावनेने आणि “अमीन काका आम्हा मुलांना खूप प्रेम देतात, आमच्या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवतात,” अशा शब्दांत व्यक्त केलेल्या भावनेने उपस्थितांचे डोळे पाणावले आणि टाळ्यांचा कडकडाट गाजला.
आमीन पटेल यांनी गेल्या काही वर्षांत प्रभाग क्रमांक ११ ला पूर्णपणे बदलून टाकले आहे. हायमास्ट लाइट्स, अंडरग्राउंड ड्रेनेज, मजबूत सिमेंट काँक्रीट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छता मोहिमा अशा अनेक विकासकामांनी प्रभागाचा चेहरा बदलून टाकला आहे. सर्व समाज, सर्व धर्म, सर्व जाती-जमातींना सोबत घेऊन केलेल्या या सर्वसमावेशक कामामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. याच जनसंपर्काची, प्रेमाची आणि विश्वासाची पावती म्हणून नागरिकांनी त्यांना १९४७ मतांच्या प्रचंड फरकाने निवडून आणले.
सत्कार स्वीकारताना अमीन पटेल यांनी भावुक होऊन म्हटले,
“प्रभागातील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबाचा भाग आहे. त्यांच्या प्रेम, आशीर्वाद आणि विश्वासामुळे आज मी येथे उभा आहे. पुढील पाच वर्षांत अधिक जोमाने, अधिक वेगाने विकासकामे राबवून प्रभाग ११ ला आदर्श प्रभाग बनवणार आहे. जैनबसारख्या चिमुकल्या मुलीच्या हातून सत्कार मिळणे म्हणजे प्रभागातील सर्व लहान मुलांनाही माझ्याबद्दल आपुलकी आहे, ही माझ्यासाठी सर्वोच्च अभिमानाची गोष्ट आहे.”
प्रभागातील नागरिकांनीही आमीन पटेल यांच्या साध्या, जमिनीवरच्या स्वभावाची आणि अडीअडचणींमध्ये तात्काळ मदत करणाऱ्या तत्परतेची मनापासून प्रशंसा केली. “अमीन भाऊ आमच्या प्रत्येक अडचणीत स्वतःच्या मानून लगेच धावतात,” अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. या सत्कार समारंभाने प्रभाग ११ मधील एकता, विकास आणि लोकविश्वासाचा एक सुंदर आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला आहे. अमीन पटेल यांचा हा यशस्वी प्रवास आणि त्यांच्यावर असलेला प्रभागातील नागरिकांचा प्रेमाचा ओलावा यातूनच दिसून येतो.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या