इगतपुरीतील मिस्टीक व्हॅली येथील न्युयॉर्क व्हिला वर नाशिक ग्रामीण पोलीसांचा छापा अवैधरित्या जुगार खेळणारे १८ इसामांसह व्हिला मालकावर कारवाई
नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर यांनी स्वतः इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात एका व्हिलामध्ये छापा टाकुन अवैधरित्या जुगार खेळणारे १८ इसमांवर कारवाई केली आहे. इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत तळेगाव शिवारात, मिस्टीक व्हॅली या ठिकाणी असलेल्या न्युयॉर्क व्हिलामध्ये काही इसम अनधिकृतपणे एकत्रित येवुन ५२ पानी पत्त्यांवर रोख रक्कम लावुन जुगार खेळत असल्याची गोपनीय बातमी अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांना मिळाली होती. बातमीप्रमाणे दि. १५/०२/२०२५ रोजी मध्यरात्रीचे सुमारास अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी स्वतः त्यांचे पथकांसह सदर ठिकाणी छापा टाकुन कारवाई केली आहे. सदर कारवाईत अवैधरित्या जुगार खेळणारे व खेळविणारे खालील इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर छापा कारवाईत वरील इसमांना अवैधरित्या जुगार खेळतांना व खेळवितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे कब्जातुन भारतीय चलनी नोटा रोख ६,७२,९७० रूपये, नेपाळ देशाच्या चलनी नोटा रोख ७०,७२० रूपये, जुगार खेळण्यासाठी लागरणारे साहित्य साधने, ५२ पानी पत्त्यांचे कॅट, तसेच ३५,७६० रू. किंमचे देशी व विदेशी मद्य, चारचाकी वाहने त्यात बीएमडब्ल्यु, दोन हुन्डाई केटा, मारूती स्विफ्ट अशी ०४ वाहने असा एकुण १८,७९,४५० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
यातील न्युयॉर्क व्हिलाचे मॅनेजर यशकुमार उर्फ शेरासिंग भगतसिंग यांना सदर व्हिला कोणाचे मालकीचा आहे याबाबत विचारणा केली असता, सदर न्युयॉर्क व्हिला हा शक्ती ढोलकिया, रा. जुहू तारारोड, सांताक्रुज पश्चिम, मुंबई यांचे मालकीचा असल्याचे सांगितले आहे.
यातील मिस्टीक व्हॅली परिसरातील न्युयॉर्क व्हिला येथुन ताब्यात घेतलेले वरील १८ इसम हे विनापरवाना अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी तीन पत्ती नावाचे जुगारावर पैसे लावुन जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले असून सदर ठिकाणावर अवैध देशी-विदेशी मद्य देखील मिळुन आले आहे. तसेच यातील व्हिला मालकाने जुगार खेळण्यासाठी जागा भाडे तत्वावर उपलब्ध करून दिल्याने, वरील सर्व आरोपी क. १ ते १८ व व्हिला मालक यांचेविरूध्द इगतपुरी पोलीस ठाणे येथे मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५, तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर, इगतपुरी पो.स्टे. चे पोनि राहुल तसरे, तसेच पथकातील सपोनि पुष्पा आरणे, पोलीस अंमलदार मयुर कांगणे, योगेश्वर तनपुरे, निलेश देवराज, शुभम गुख, किरण आहेर, पंकज दोंदे, सुनिल जगताप, संदेश भिसे, किशोर वाघेरे, मेघा कातकाडे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या