 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003. |
मनमाड :-लग्न झाले नंतर नव वधूचे नाव आधार कार्ड वर अपडेट करणेसाठी तसेच इतर खुप शासकीय कामा साठी शासनाने तर्फे विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे बंधनकारक करण्यात आलेले आहे, म्हणून विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र प्राप्त करणे हे नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे,
विडिओ पाहा दोन वेळा क्लिक करा
महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणी विवाह नोंदणी अधिनियम 1998 कलम 2 (क) नुसार महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागास विवाह नोंदणी जबाबदारी दिलेली आहे, त्या नुसार उप जिल्हा रुग्णालयातील कार्यालय हे मनमाड शहरात एकमात्र विवाह नोंदणी कार्यालय आहे,
परंतु उप जिल्हा रुग्णालय मनमाड कार्यालयात महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणी विवाह नोंदणी अधिनियम 1998 कायद्या नुसार व शासनाने ठरून दिलेले कार्यलयीन कामकाजच्या वेळी दररोज विवाह नोंदणी होत नाही,उप जिल्हा रुग्णालय मनमाड कार्यालय तर्फे विवाह नोंदणी ही फक्त गुरुवारीच केली जाते,त्यांच्या या कृती मुळे शासनाने ठरून दिलेले नियमांचा भंग होत असून शहरातील नागरिकांची खुप गैरसोय व त्रास देखील होत आहे,
म्हणून महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणी विवाह नोंदणी अधिनियम 1998 कलम 2 (क) नुसार उप जिल्हा रुग्णालय मनमाड कार्यालयात शासनाने ठरून दिलेले नियमांनुसार कार्यालयीन कामकाज दिवसात सोमवार ते शुक्रवार असे दररोज विवाह नोंदणी ही करण्यात यावी जेणे करून सर्व सामान्य नागरिकांना कायद्यानुसार मिळालेल्या अधिकाराचा भंग होणार नाही तसेच नागरिकांना नाहक त्रास देखील होणार नाही,अशी मांगणी मानव अधिकार रक्षक मंच तर्फे निवेदन द्वारे करण्यात आली आहे तसेच
जर महाराष्ट्र विवाह नोंदणी कायदा व शासनाने ठरून दिलेल्या नियमानुसार दररोज विवाह नोंदणी सुरु केली गेली नाही, तर आमच्या संघटने तर्फे आंदोलन केले जाईल असे ईशारा देखील निवेदनात देण्यात आले आहे,
या वेळी, मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीयध्यक्ष,उल्हास डफळे,जिल्हा अध्यक्ष कैलास गोसावी, जिल्हा सचिव,वसीम शेख, जिल्हा पदधिकारी बबलू शेखे,आबीद शेख, बाबा पठाण, तौफिक पठाण, आदी पदधिकारी उपस्थित होते,
0 टिप्पण्या