मनमाड :- मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी नुकतेच रफिक भाई मित्र मंडळ तर्फे मनमाड बोहरी कांपाउंड येथे रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पाडला,
मनमाड येथे रविवारी सायंकाळी 6: 47 मिनीटांनी इफ्तार पार्टी झाली. यावेळी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्री दीपक गोगड यांनी देखील या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या या वेळी समाजसेवक मजीद भाई शेख (दादा ) यांनी सांगितले की, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणेसुद्धा महत्त्वाचे आहे. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधु भावना वाढीस लागण्यास मदत होते. अशा सणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. म्हणून सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची भूमिका आहे. तरी रोजा इफ्तार पार्टीला आलेल्या सर्व मान्यवरांचे मी रफिक भाई मित्र मंडळ तर्फे हार्दिक स्वागत व आभार व्यक्त करतो असे मत समाजसेवक मजीद भाई शेख दादा तर्फे भावना व्यक्त करण्यात आले, यावेळी माजी नगरसेवक संतोष आहिरे, उल्हास डफळे, कयाम सैय्यद, आदम भाई, रवी निकम, मोनीश चाबुकस्वार, गणेश एळींज, बोहरी कंपाउंड व शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या