Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

जनावरांना पिण्यास देखील अयोग्य असेल असे पाणी मनमाड नगरपरिषदतर्फे नागरिकांना पिण्यास दिले जात आहे, मानवाधिकार रक्षक मंचतर्फे राज्य मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल,

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार 8888509003.
 मनमाड :- जनावरांना पिण्यास देखील अयोग्य असेल असे पाणी मनमाड नगरपरिषदतर्फे नागरिकांना पिण्यास वितरण करण्यात आले आहे,

 नाईलाजाने नागरिकांना गाळ मिश्रित गढूळ पाणी उकळून व फिल्टर करून वापरावे लागत आहे, त्यातही दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा नगरपालिका तर्फे नागरिकांना विविध प्रकारे धमक्या देऊन वसुली करण्याचे काम नगरपालिकेने चालवलेले आहे,

 स्थानिक स्वराज्य संस्था तर्फे विविध प्रकारे सेवा दिल्या जातात त्या सेवाचा मोबदल्यात नागरिकांतर्फे विविध प्रकारे कर घरपट्टी पाणीपट्टी कर शासनाला मोबदला म्हणून दिला जातो, त्या मोबदल्याचा ऐवज शासनातर्फे उत्तम सेवा देण्याची हमी शासन देत असतो, परंतु स्थानिक पातळीवर अधिकारी हे अकार्यक्षम असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो, असेच प्रकार सध्या मनमाड शहरात घडत आहे 

मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास पी. डफळे यांच्या कडून मनमाड नगर पालिका मुख्य अधिकारी श्री. शेषराव चौधरी हे निष्क्रिय व अकार्यक्षम असल्याने मानव अधिकार आयोग कडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे,
 मनमाड शहरात 25 दिवसाने मनमाड नगर पालिकातर्फे नळाला पिण्याचे पाणी सोडले जाते, सोडले पिण्याचे पाणी हे गटाराचे पाणी मिश्रित सारखे असून पाणी हे दुर्गंधीयुक्त, व पिण्यासाठी अयोग्य आहे, असे असतांना देखील सदर प्रशासनाने नागरिकांच्या जीविताशी खेळण्याच्या प्रकार चालविला आहे या अशुद्ध व दुर्गंधी युक्त पिण्याच्या पाण्यामुळे नागरिकांना असह्य व दुर्धर आजार उद्भवू शकतात व तसे प्रकार तसे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात वाढत चालले आहेत,

न.पा, नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी,स्वच्छता कर,पर्यावरण कर,मनोरंजन कर,अग्निशमन कर,या सारखे अनेक विविध कर लादून नागरिकानकडून GST सहित वसूल करते परंतु त्या प्रमाणात नागरिकांना सुविधा देण्यास मनमाड नगर पालिका प्रशासकीय अधिकारी श्री शेषराव चौधरी सो। हे निष्क्रिय व अकार्यक्षम ठरलेले आहेत म्हणून मनमाड शहराला करण्यात येत असलेला पाणी पुरवठा हा तुरटी व क्लोरीन वायूच्या भेसळीमुळे गढूळ स्वरूपाचे पाणी येत आहे व ते आरोग्यास अपायकारक नाही असा बनावट संदेश तयार करून तो माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला, व मनमाड शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्यात आली परंतु सदर दुर्गंधीत पाणी व पाण्याच्या तळाला गटार मिश्रित गाळाचा थर आढळून येत आहे ते नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक आहे म्हणून मनमाड नगर पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी पिण्याच्या पाण्यासंदर्भात सदर प्रसारित केलेला संदेश खोटा व बनावट असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा आहे व न.पा पाणीपट्टी वसूल करण्यास कोणत्याही प्रकारची माणुसकी वा कुचराई न दाखवता वसुली करणार हे तितकेच सत्य आहे. जर दाम आम्ही चुकवतो तर पाणी पुरवठा हि तसाच करावा ... मनमाड नगर पालिका नाळा द्वारे नागरिकांला पिण्याचे पाणी पुरवठा करत असून ते पाणी गटार मिश्रित, दुर्गंधीयुक्त, व पिण्यासाठी अयोग्य असून देखील सदर प्रशासनाने नागरिकांच्या जीविताशी खेळण्याच्या प्रकार चालविला आहे या अशुद्ध व दुर्गंधी युक्त पिण्याच्या पाण्यामुळे नागरिकांना असह्य व दुर्धर आजार उद्भवू आले असून व तसे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात वाढत चालले आहेत, म्हणून आम्ही मानवाधिकार रक्षक मंचतर्फे राज्य मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केली आहे व वेळ आल्यास आम्ही मुंबई उच्च न्यायालयात देखील दाद मागु 
व जबाबदार अधिकारी याच्यावर कायदेशीर कार्यवाही करू,
भारतीय राज्यघटनेत नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळणे हे मौलिक का अधिकार आहे नगरपालिका ने आपले मौलिक कर्तव्य बाजावून नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी द्यावे, अशी मागणी,मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास पी. डफळे तर्फे करण्यात आलेली आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या