Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कांचन सुधा इंटरनॅशनल स्कूल, शिंगवे शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा.

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

मनमाड.शनिवार दि. १०/०२/२४ रोजी कांचन सुधा इंटरनॅशनल स्कूल, शिंगवे शाळेत सकाळ पासूनच पालकांची वर्दळ बघायला मिळाली. शालेय आवारात भव्य मंडप, व्यासपीठ सजवलेले बघायला मिळाले. त्यांचे निमित्त सेन्हसंमेलन २०२४.
या कार्यक्रमासाठी श्री. योगेश भंडारी, भंडारी एन. एक्स. ज्वेलरीचे संचालक तसेच मनमाड येथील आनंद सेवा संघाचे सदस्य प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री अजय जैन, उपाध्यक्ष श्री अक्षय जैन, सेक्रेटरी सौ. रचना जैन, संस्थेच्या समन्वयिका सौ. दर्शना जैन, शिंगवे शाळेच्या समन्वयिका सौ. राणी भंडारी, विश्वस्त सौ. निकिता जैन, समिक्षा जैन, संयम जैन, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. एन. पांडा, प्री-प्रायमरी इन्त्र इन्चार्ज श्री. आकांक्षा आव्हाड, पर्यवेक्षिका श्री. भाग्यश्री आहेर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद‌यार्थी आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. याप्रसंगी

मागील वर्षीच्या इ. नर्सरी ते इयत्ता. १०.वीच्या गुणवंत वि‌द्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक व चालू शैक्षणिक नैपुण्य वर्षातील विविध मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी इयत्ता.८वीची विद्यार्थिनी कु. हेमांगी शर्मा हिने स्कूल रिपोर्ट सादर केला. सिनिअर के.जी. ची विद्यार्थिनी कु.. इशान्वी बोहाई इयत्ता ८वी विद्यार्थी चि. इंद्रजित खर्डे यांनी शाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी विविध डान्सप्रकार, सामाजिक जागरुकतेवर आधारित नाटिका, हास्य नाटिका, भारूड, छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीत, देशभक्तीवर गीत इ. कलाविष्कार सादर केले. शाळेतील विद्यार्थी मो.मुझाम्मिल शेख, मो.अहमद फारुकी, कु- सि‌द्धी मढे यांनी राम, लक्ष्मण व सीतामातेच्या भूमिका साकारल्या होत्या. यश धारवाडकरने हनुमानाची तसेच दक्ष जाधव याने छत्रपती शिवाजी महाराजांची, वेशभूषा साकारली होती. विद्यार्थिनी कु. हर्षदा कातकडे हिने छत्रपती.शिवाजी महाराजांचा जयजयकार सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अपेक्षा मढे, चि. सुमित मढे,. चि. संकेत गुंजाळ यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य श्री पी.एन. पांडा यांनी शाळेच्या चालू शैक्षणिक वर्षातील स्कूल रिपोर्ट सविस्तर सादर केला. तसेच विश्वस्त सौ. निकिताजी जैन, समन्वयिका सौ. राणीजी भंडारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. अजयजी जैन यांनी शाळेच्या भविष्यातील नियोजना- बद्दल सविस्तर मा मनोगत व्यक्त केले. शाळेचा विद्यार्थी मुझम्मिल शेख याने आभार मानून सुंदर, नियोजनबद्‌ध कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सांस्कृतिक विभाग
प्रमूख सौ. कविता परदेशी, श्री. पी. एस. सूर्यवंशी, श्री अँभनी नायडू, श्री. महेश चव्हाण, श्री. पंकज त्रिवेदी, श्री. धीरज पवार, श्रीमती सारिका बोढखे, श्रीमती योगिता आव्हाड, श्रीमती विद्या वर्मा, श्रीमती अश्विनी सोनवणे, श्रीमती वैशाली पेंढारकर, कु. सोनाली निकम श्रीमती ज्योती गवळी, श्री. आर.टी. सूर्यवंशी, श्री अनिकेत वास्कर, श्री, म अफताब शेख, श्री. मुझाम्मिल शेख, श्रीमती अनिता थेटे, श्रीमती रश्मी पाटील, शांनी विशेष मेहनत घेतली श्रीमती खेता काळे, श्रीमती सुप्रिया शिंदे, श्रीमती सूचिता गुंजाळ, श्री जितेंद्र उबाळे यांनी विशेष मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या