Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहरात अर्ज बहादूरांचा सुळसुळाट, प्रशासकीय यंत्रणाला दिले जाते नाहकत्रास,

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003

मनमाड शहरात अर्ज बहादूरांचा  सुळसुळाट, प्रशासकीय यंत्रणाला दिले जाते नाहकत्रास,

 मनमाड:-  मनमाड शहर हे विकासाच्या मार्गावर असून मनमाड शहरात मालक व विकासक  हे नगरपालिकेत  अर्ज व प्रस्ताव सादर करून बांधकाम   परवानगी प्राप्त करून रोज नवीन बांधकामांना सुरुवात करतात,

 ज्या एरियात ज्या विभागात बांधकाम होत असते त्या विभागातील नागरिकांना जर संबंधित बांधकामामुळे त्रास होत असेल, त्या कामामुळे कोणतेही व्यक्ती बाधित होत असेल  तर नागरिकांतर्फे मनमाड नगर परिषदेला तक्रार अर्ज येतात , आणी त्या तक्रार अर्जावर मनमाड नगर परिषद प्रशासन देखील गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई देखील करत असते, 
परंतु मनमाड शहरात अर्ज बहादूरांतर्फे काही विचित्र प्रकार सुरू आहे, राहायला एक एरियात अन अर्ज करायचं दुसऱ्या एरियातील बांधकामाचे, त्या बांधकामाशी कोणताही संबंध नसतांना, संबंधित बांधकामाशी कुठलेही त्रास होत नसतांना, त्या कामामुळे कोणतेही नागरिक बाधित होत नसतांना, देखील या अर्ज बहादूरांने मनमाड नगरपरिषदेला अर्ज करण्यास सुरुवात केलेली आहे, जणू अश्या अर्जंचा पाऊसच पडला आहे, 

असे देण्या अन घेण्याचे अर्ज करून अर्ज बहादूरांतर्फे प्रशासकीय यंत्रनेला नाहक त्रास देऊन  दबाव टाकण्याचा काम करण्यात येत आहे, हा विषय खूप गांभीर्य होत चाललेला आहे,
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६, व बांधकाम विकासक नियमावलीची कोणतीही व कुठलेही  माहिती नसतांना, हे अर्ज बहादूर, उलट सुलट अर्ज करून,  हे काम कसे झाले, त्याची परवानगी कशी दिली, असे उलट सुलट  वेगवेगळे प्रश्न निर्माण करून प्रशासकीय यंत्रणानावर दबाव टाकून नाहक त्रास देण्याचे कार्य करतांना दिसत आहे,  परिणामी मनमाड नगर परिषद  प्रशासकीय यंत्रणा तर्फे शहरातील नागरिकांना मिळणारे सोयी- सुविधा यास नाईलाजाने विलंब होत आहे,

असे अर्ज, व्यक्तिगत कारणाने तर नाही ना.? व असे अर्ज,

आर्थिक हितसंबंधासाठी तर नाही ना.? याची नगरपरिषद प्रशासनाने सखोल चौकशी करावी, व असे बिनकामी अर्ज तात्काळ निकाली काढावे, जर वारंवार असे अर्ज करून कोणी अर्ज बहादूर प्रशासकीय यंत्रणेस  नाहक त्रास देत असेल तर त्या अर्जाचे व्यक्तिगत कारण.? आर्थिक हितसंबंध.? भ्रष्टाचाराची शंका तपासावी, जर असे काही कारण निदर्शनास आल्यास प्रशासनाने  असे अर्ज थेट नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना पाठवून योग्य ती फौजदारी कारवाई करावी, जेणेकरून असे  देण्या अन घेण्याचे अर्ज थांबतील व नगरपरिषद प्रशासनावर नाहक दबाव ताण वाढणार नाही व शहरातील नागरिकां मिळणारी सोयी-सुविधा व शासकीयकामे  हे नियमित वेळेत पार पडतील अशी मागणी शहरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या