Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

लायन्स तर्फे भव्य पतंग महोत्सव स्पर्धा 2024.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

लायन्स तर्फे भव्य पतंग महोत्सव स्पर्धा 2024.

मनमाड.मकर संक्रांति निमित्त येथील लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे भव्य अशा पतंग महोत्सव स्पर्धेचे रविवार दि. 14 जानेवारी 2024 वेळ दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत आयोजन केले आहे. ठिकाण भगवान श्री महर्षी वाल्मिकी स्टेडियम मनमाड येथे ही स्पर्धा होणार आहे. या पतंग  महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन क्लबचे अध्यक्ष लायन सुचिता खताळ सचिव लायन गणेश हडपे व खजिनदार लायन मनीषा अग्रवाल यांनी केले आहे. या पतंग उत्सवात सर्व लहान थोर मुले मुली श्री पुरुष ज्येष्ठ नागरिक सहभागी होऊ शकतात. प्रवेश विनामूल्य आहे. या उपक्रमातून जनजागृती पर संदेश देण्यात येत आहे.. जसे की रस्त्यावर गच्चीवर पतंग उडू नका अपघात होतात. मोकळ्या मैदानातच पतंग उडवा नायलॉन मांजा चा वापर करू नका. साधा धागा वापरा. पतंगामागे रस्त्यावर धावू पडू नका. पतंग फुल वायरला अटकते तेव्हा दगड फेकू नका. आपणास दुसऱ्याला पक्षांना प्राण्यांना व पर्यावरणाला इजा होईल असे प्रकार करू नका असा संदेश या पतंगोत्सवा मार्फत देण्यात येणार आहे. या पतंग स्पर्धेत विविध बक्षिसे देण्यात येणार आहे... जसे की सर्वात उंच जाणारा पतंग. सर्वात भव्य असा पतंग. सर्वात सुशोभित पतंग. सर्वात लहान बालकाचा पतंग. सर्वात वयस्कर व्यक्तीचा पतंग. सुरेख संदेश देणारा पतंग इत्यादी गटात बक्षीस देण्यात येणार आहे... तरी जास्तीत जास्त शाळांनी विद्यार्थ्यांनी व सर्व नागरिकांनी या सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन प्रोजेक्ट चेअर पर्सन ला. डॉ निलेश राठी यांनी केले आहे. सदरहून कार्यक्रमाचे प्रायोजक पंकज खताळ पाटील फाउंडेशन आहेत.. पतंग महोत्सव स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा 97 66 52 84 66.,/, 98 81 9418 48. पतंग महोत्सव स्पर्धेत भाग घेऊन मकर संक्रांति सणाचा आनंद द्विगुणित करूया.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या