येवल्यातील कै. सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अजय जैनसह अक्षय छाजेड गजाआड
नाशिक ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.8888509003. सन २०२१ मध्ये येवला शहर पोलीस ठाणे येथे गुरनं ४४२ / २०२१ कलम ४२०, ४०६, ४०८, ४०९, २०१, ३४ सह महराष्ट्र ठेवीदार (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चे कलम १४६, १४७ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयात कै. सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला, जि. नाशिक या संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक व संस्थेचे कर्मचारी अशांनी संगणमत करून खातेदार व ठेवीदार लोकांना विविध योजनांचे जास्त व्याजदराचे अमिष दाखवून लोकांचा विश्वास संपादन करून ठेवीदारांचे पैशांचा स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी उपयोग करून ठेवीदारांची रक्कम २१,९६,९९,८५०/- रूपयांची फसवणुक केली होती.
सदर प्रकरणातील मुख्य आरोपी अजय भागचंद जैन हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्यास अटक करणेकामी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमले होते. सदर गुन्हयातील आरोपी अजय जैन हा गुन्हा घडल्यापासून राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध शहरांमध्ये आपले अस्तित्व लपवुन वास्तव्य करत होता. त्यानुसार तपास पथकाने त्याचे सध्याचे वास्तव्याबाबत गोपनीय माहीती प्राप्त केली असता, तो संभाजीनगर जिल्हयात असल्याचे समजले. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संभाजीनगर जिल्हयातील वाळुंज एम.आय.डी.सी. परिसरात शोध घेतला असता, तो मनमाड शहरात गेला असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली.
उपरोक्त माहितीवरून आरोपी १) अजय भागचंद जैन (छाजेड), रा. श्रीकृष्ण कॉलनी, विंचुर रोड, येवला, ता. येवला यास मनमाड शहारातील माधवनगर परिसरातून पाळत ठेवून ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याचेसोबत नमुद गुन्हयातील फरार आरोपी २) अक्षय रविंद्र छाजेड, रा. श्रीकृष्ण कॉलनी, विंचुर रोड, येवला वास देखील ताब्यात घेतले आहे. यातील दोन्ही आरोपीना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांची ०४ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल तसरे हे करीत आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी सदर गुन्हयाचे तपासात केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, सपोनि श्री. गणेश शिंदे, पोहवा नवनाथ सानप, पोना विश्वनाथ काकड, चापोना फड, तसेच पोना हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांचे पथकाने सदर आरोपींचा कौशल्याने शोध घेवून त्यांना अटक केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या