नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पंतप्रधान किसान समृद्धी केंद्राचे लाईव्ह ऑनलाईन उद्घाटन.
जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार 8888509003.
नांदगाव.दि.27 जुलै 2023 रोजी नांदगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र च्या उद्घाटन प्रसंगी आज आधुनिक शेती प्रधान देशाचे आधुनिक मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी हे राजस्थान च्या सीकर इथे 1.25 लाख पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र देशाला समर्पित करणार आहे व 8.50 कोटी शेतकरी यांच्या अकाऊंट मध्ये किसान सम्मान योजने अंतर्गत 17000 कोटी रुपये ची 14व्ही वी कीश्त जमा होणार आहे या कार्यक्रम च्या लाईव्ह ऑनलाईन कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी चे नांदगाव विधानसभा प्रमुख श्री पंकजभाऊ खताळ,
भाजपा नाशिक जिल्हा व्यापार आघाडी चे अध्यक्ष श्री दत्तराज भाऊ छाजेड, भाजपचे माजी जिल्हा महामंत्री भाऊराव निकम,भाजपा जिल्हा मंत्री श्री सागर भाऊ फाटे, भाजपा शहर अध्यक्ष श्री उमेश भाऊ उगले, बृजेश पाटील, मनमाडचे भाजपा सरचिटणीस नितीन परदेशी, दिव्यांग आघाडीचे,दीपक पगारे भाजपाचे श्री रावसाहेब वानखेडे,शिवसेना शिंदे गट चे युवासेना जिल्हा पदाधिकारी श्री सागर भाऊ हिरे, भरत भाऊ पारख व नांदगाव तालुका कृषी अधिकारी श्री डमाळे साहेब, मधुकर नेरकर सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी, संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व शेतकरी बांधव व बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या