मुख्यमंत्री शिंदेंचा मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या घरवाटपात एक हजार कोटींचा घोटाळा, माहिती अधिकारातून पुरावे आले समोर
जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मेट्रो’ प्रकल्पग्रस्तांच्या घरवाटपात एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आज आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी आज केला असल्याचे वृत्त सामनाने प्रसिद्ध केले आहे. प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या दोन हजार घरांमध्ये हा घोटाळा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये खोटे लाभार्थी, खोटे सर्वेक्षण, एकाच व्यक्तीला चार ते पाच घरे असे गंभीर प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माहिती अधिकारात मिळालेले पुरावेच त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ‘एमएमआरडीए’कडून आतापर्यंत सुमारे 65 हजार ‘पीएपी'(प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन) घरांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे 2014 पासून नगरविकास खाते असल्यापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा सुरू असल्याचा आरोप मेमन यांनी मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन केला आहे. दोन हजार घरांच्या वाटपात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. सद्यस्थितीत कोणत्याही घोटाळ्याबाबत राज्य सरकारकडून न्याय मिळत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्यासारखे कारभार करीत असल्यामुळे त्यांच्यांकडे तक्रार केली तर ते त्यांच्या ‘कोर्टा’त कोणत्याही घोटाळेबाजाला केवळ चार तासांत ‘क्लीन चिट’देतात असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळापासून सुरू असलेल्या या घोटाळ्याबाबत न्याय मागण्यासाठी योग्य वेळी न्यायालयातही दाद मागणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
असा होतो घोटाळा
2019 मध्ये मेट्रो-6 प्रकल्पाच्या जमिनीसाठी सर्वेक्षण करण्यात आले. जनगणनेत एकूण 272 वास्तूंचे सर्वेक्षण करण्यात आले आणि 178 घरे पात्र घोषित करण्यात आल्या. त्यानंतर 25 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांनी ‘एमएमआरडीए’कडून जनगणनेच्या डाटाच्या मंजुरीसाठी पत्र सादर करण्यात आले. याबाबत त्यांना ‘एमएमआरडीए’कडून मान्यता मिळाली आणि 28 एप्रिल 2022 रोजी त्यांनी मुख्य ‘एमएमआरडीए’च्या ‘एसडीसी’कडून मिळालेल्या मान्यतेवर आधारित ‘बीएसईएस’ अहवालाचा मसुदा सादर करून 114 बोगस प्रकरणे करण्यात आली.
कोणत्या परिसरात किती घर
आदर्श नगर -39 सुभाष नगर – 35 संतोषी माता नगर – 14 भांडारकर वाडी – 10 मिलिंद नगर (साकी विहार स्टेशन) – 5 मिलिंद नगर (टॉवर 28) – 6 मिलिंद नगर (टॉवर 11ए) – 26 एकूण – 114
‘क्राइम सिंडिकेट’मध्ये भाजपचे दलाल मुख्यमंत्री शिंदे यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या घोटाळ्याच्या मुख्य उपजिल्हाधिकारी रचना इंदुरकर असल्याचे त्या म्हणाल्या. एखाद्या खात्यात तीन वर्षांनंतर अधिकाऱ्याची बदली होणे अनिवार्य असताना शिंदे यांच्या आशीर्वादाने त्या एकाच खात्यात गेली सलग दहा वर्षे ठाण मांडून असल्याचा आरोपही मेनन यांनी केला. शिवाय या ‘क्राइम सिंडिकेट’मध्ये उपजिल्हाधिकारी सांगले, ईक्यूएमएस समन्वयक दीपक धोपट आणि पूनम महाजन यांचे निकटवर्तीय अजय बडगुजर, रमेश यादव, पोपट तिवारी, रवी पवार, विजय मोरे यांसारखे भाजपशी संबंधित अनेक दलालांचा समावेश असल्याची माहिती मुंबई उपाध्यक्ष संदीप कटके यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या