केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते भारतातील रुग्ण सुरक्षेला गती देण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन.
"भारताने नेहमीच रुग्णांच्या सुरक्षिततेचे महत्त्व ओळखले आहे आणि सार्वजनिक आरोग्य बाब मानून ती सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे" दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी रुग्णांची काळजी ही अत्यावश्यक गोष्ट : डॉ. भारती प्रवीण पवार "ग्लोबल पेशंट सेफ्टी ॲक्शन प्लॅन 2021-2030’’वर स्वाक्षरी करणारा भारत अग्रगण्य देशांपैकी एक होता" नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी, 2023 “भारताने नेहमीच रुग्णांच्या सुरक्षिततेचे महत्त्व ओळखले आहे आणि सार्वजनिक आरोग्य बाब म्हणून त्याला प्राधान्य दिले आहे. ” असे प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने भारतात रुग्ण सुरक्षेला गती देण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राला मार्गदर्शन करताना केले. कार्यशाळेमध्ये राज्ये आणि विविध भागधारक विभागांना राष्ट्रीय रुग्ण सुरक्षा अंमलबजावणी आराखडा , तसेच रुग्णांच्या सुरक्षेसाठी आरोग्य सेवा व्यावसायिकांची क्षमता वाढवणे आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी त्रैमासिक राज्य कृती योजना विकसित करण्यासाठी चौकट तयार करण्यासाठी त्यांच्या भूमिकेबद्दल संवेदनशील बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
डॉ. पवार यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल सर्व भागधारकांचे अभिनंदन केले आणि नमूद केले की, 2002 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत जागतिक आरोग्य महासभेच्या ठरावावर सहमती दर्शवली आणि ‘ जागतिक रुग्ण सुरक्षा कृती योजना 2021-2030 ‘ वर स्वाक्षरी करणारा भारत हा अग्रगण्य देश होता. रुग्णांची सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विविध रणनीती आणि कार्यक्रमांचा समन्वय साधण्यासाठी राष्ट्रीय रुग्ण सुरक्षा अंमलबजावणी आराखडा (एनपीएसआयएफ) 2018 मध्ये लागू करण्यात आला आहे.
राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावर भर दिला की, दर्जेदार आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यासाठी रुग्णांची सुरक्षा ही अत्यावश्यक बाब आहे आणि आपल्या राष्ट्राने हाती घेतलेले उपक्रम आणि नवकल्पनांनी त्या दिशेने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना डॉ. पवार म्हणाले की, “भारताने महत्त्वाच्या अडथळ्यांना आणि धोक्यांना तोंड देत, देशाच्या सर्वात दूर आणि दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या कार्यात अभूतपूर्व प्रगती केली आहे”.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या