Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

जाहिरातबाजीवर शिंदे-फडणवीस सरकारने 7 महिन्यात केले 42 कोटी खर्च .

 

जाहिरातबाजीवर शिंदे-फडणवीस सरकारने 7 महिन्यात केले 42 कोटी खर्च .

जन आवाज न्युज संपादक .आफरोज अत्तार.
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यापासून फक्त 7 महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल 42 कोटी 44 लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती RTI मधून प्राप्त झाली आहे. ही बातमी 'एबीपी माझा'ने दिली आहे.


 माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती शासनाच्या माहिती जनसंपर्क विभागाकडे मागितली होती. त्यांनी म्हटलं आहे की, "नुकतंच राज्य शासनाकडून ही देयके मला उपलब्ध झाली. या खर्चाची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास 19 लाख 74 हजार रुपये जनतेच्या खिशातून खर्च होत आहेत."


 असं जाहिरातबाज सरकार जनतेच्या विकासासाठी काम करेल का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या