मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे शुशोभिकरण करीता सोमवारी आमरण उपोषण! सकल मराठा समाज, मनमाड.
जन आवाज न्युज.संपादक . अफरोज अत्तार.
मनमाड.महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री छत्रपती शिवजी महाराज यांचा मनमाड मध्ये गेल्या कित्येक वर्षापासुन अर्थकृती पुतळा प्रस्तापित झालेला आहे. जेव्हापासुन महाराजांचा अर्धकृती पुतळा प्रस्तापित झालेला आहे तेव्हापासून आजपर्यंत या पुतळ्याच्या सुशोभिकरणा विषयी मनमाड नगर परिषदेमार्फत कुठेही लक्ष दिले गेलेले नाही. या याबाबत पालिकेने कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. याबाबत गेल्या १० ते १५ वर्षापासून अनेक संघटनांनी व त्यांचे कार्यकर्ते यांनी महाराजांच्या पुतळयाच्या सुशोभिकरणाबाबत मागणी करून निवेदने दिली असून देखील पालिकेकडुन त्यास प्रतिउत्तर म्हणुन फक्त आश्वासनेच मिळाली. प्रत्यक्षात कृती झालेली नाही.
मागील शिवजयंतीला म्हणजे १२ फेब्रुवारी २०२२ ला सांगितले गेले की येत्या चार महीन्यात महाराजांच्या पुतळयाचे सुशोभिकरणाचे काम पुर्ण होईल. यासाठी नाशिकच्या शिवभक्ताला याविषयीचे डिझाइन व आराखडा करून देण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु चार महीने होऊन देखील याबाबत पालिकेतर्फे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे टेंडर पास केलेले नाही व सुशोभिकरण्याच्या कामास सुरुवात केली असे दिसत नाही.
महाराजांची जयंती जवळ येत आहे तरी याबाबत प्रशासनाकडुन कोणतीही दखल घेतली जात नसेल व आख्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या महाराजांच्या विषयी असे राजकारण होत असेल तर याच विषयाचा राग, संताप मनमाडमधील सर्व शिवभक्त यांना आहे. सर्व शिवभक्त याविषयी सुशोभिकरणाचे काय झाले असा प्रश्न करीत आहेत. परंतु पालिकेमार्फत या लोकप्रतिनिधीमार्फत याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नसेल तर मी स्वतः नाना आबाजी शिंदे व श्री विष्णु शंकर चव्हाण सोमवार दि. १२ /१२/ २०२२ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे सुशोभिकरण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार आहे. जर प्रशासनाने याबाबत दखल घेतली नाही तर त्यावेळी होणाऱ्या परिणामांस मनमाड नगर पालिका जबाबदार असेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. असे निवेदन नगरपालिका कार्यालीन अधीक्षक पाईक साहेब यांना देण्यात आले यावेळी नाना शिंदे,भीमराज लोखंडे ,विष्णू चव्हाण, व सकल मराठा समाज पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या