समाजाच्या समस्या घेऊन चालणारा पत्रकार असतो .जेष्ठ पत्रकार भास्कर कदम .



मनमाड (प्रतिनिधी) : समाजाच्या समस्या घेऊन चालणारा पत्रकार असतो .ज्या समाजात आपण वावरतो त्याचे आपण देणे लागतो असे मत श्री क्षेत्र नस्तनपूर येथे झालेल्या नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या स्नेह मेळाव्यात जेष्ठ पत्रकार भास्कर कदम यांनी व्यक्त केले


श्री क्षेत्र शनेश्वर नस्तनपूर येथे मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्नित नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ओळखपत्र वाटप तसेच स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते याप्रसंगी पत्रकारांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते प्रारंभी मंदिरात श्री शनैश्वर महाराजांची आरती करण्यात आली त्यानंतर देवस्थानच्या हॉलमध्ये पत्रकारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार भास्कर कदम होते तर मंचकावर पत्रकार संघाचे तालुका समन्वयक अमोल खरे, जेष्ठ पत्रकार मारुती जगधने, सुरेश शेळके, नरहरी उंबरे, जगन पाटील हे होते. या वेळी उपस्थित पत्रकारांनी पत्रकार संघावर आणि कार्यावर विश्वास व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले केले तर तालुका समन्वयक अमोल खरे म्हणाले की नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेची मान्यता असून आपले संघटन मजबुत आहे एकजुटीने कार्य करून पत्रकारांच्या समस्या सोडवायच्या आहेत तसेच युट्यूब पोर्टल हे ही या संघटनेशी निगडीत आहे .संघटनेचा मोठा मेळावा लवकरच राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित लवकरच घेण्यात येणार असल्याचे सांगितले जेष्ठ पत्रकार मारुती जगधने म्हणाले की पत्रकार हा सतत तान- तनावात असतो त्यासाठी कुटूंबाचा मेडीकल विमा करून घ्यावा, जेष्ठ पत्रकार जगन पाटील म्हणाले की, एकसंघ विमा सर्वांसाठी फायदेशीर आहे.संघटनेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू या .जेष्ठ पत्रकार सुरेश शेळके म्हणाले की संघटनेचे कार्य जोमात सुरू असून अफवांवर विश्वास ठेवू नये जेष्ठ पत्रकार नरहरी उंबरे म्हणाले की आपल्या पत्रकार संघाच्या सदस्यांनी इतरांकडे लक्ष न देता आपले कार्य करून आपण एक  एकसंघ राहूया. पत्रकार संजय मोरे म्हणाले की विरोधकांचे कामच असते लक्ष देणे. ते आपल्यात फुट पडण्याचा प्रयत्न करतील कोणीही त्यांना न जुमानता एकीने राहू .प्रा सुरेश नारायणे यांनी संघटना वाढीला व पाठबळाला उपक्रमांची गरज आहे असे सांगितले. पत्रकार निलेश वाघ यांनी संघटना बांधणी

गरजेची असल्याचे सांगितले गणेश केदारे यांनी शुभेच्छा दिल्या . पत्रकार बाबासाहेब बोरसे यांनी सांगितले की २० वर्षापूर्वी एकत्रीत असलेले पत्रकार आज पुन्हा एकवटले आहे. एकात्मतेची धार तेज ठेवा, योगेश म्हस्के यांनी सांगितले की संघटनेच्या माध्यमातून आरोग्य शिबीर भरवावेत. दीपाली केदारे  म्हणाले की आपल्या माध्यमातून इतरांना प्रसिध्दी मिळते पत्रकारांनी राबविलेले कार्यक्रम हे इतरानां समजले पाहिजे पत्रकार अशोक बिदरी म्हणाले की पत्रकार संघाची मरगळ झटकली गेली आहे.नव्या जोमाने संघटना वाढीसाठी प्रयत्न करु सतीश पुनतांबेकर म्हणाले की फोटोग्राफर सेंटर नजरेत ठेऊन सर्व फोटोग्राफरांना तालुका पातळीवर एक केले. प्रेस फोटोग्राफर निलेश्वर पाटील, सुहास पुंणतांबेकर, राजु लहिरे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित असलेल्या पत्रकारांना  ओळखपत्राचे वाटप करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सुरेश नारायणे यांनी केले.तर आभार संदिप जेजुरकर यांनी मानले.  कार्यक्रमाचे आयोजन  पत्रकार सोमनाथ घोंगाणे यांनी केले होते तर नियोजन जगन पाटील यांनी केले होते या वेळी पत्रकार प्रमित आहेर, नाना आहिरे, सचिन गायकवाड, बाबासाहेब काळे, प्रज्ञानंद जाधव, धनंजय देशमुख, ज्ञानेश्वर दुकळे
आदींनी परिश्रम घेतले